SANGLI
देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी मा.द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती झालेबद्दल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थीनीना सायकल वाटप...
शुक्रवार २२ जुलै : सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वतीने १७ शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मा.द्रोपदी मुर्मू यांची निवड झालेबद्दल आणि
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस
यांच्या वाढदिवसानिमित्त हे वाटप करण्यात आले. "पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ' बेटी बचाव - बेटी पढाव ' या घोषणे प्रमाणे मुली जास्तीत जास्त शिकल्या पाहिजेत, त्यांच्या शिक्षणात काही अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी हा प्रयत्न आहे." असे आमदार सुधीरदादा गाडगीळ यावेळी म्हणाले.
यावेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, प्रमोद भोकरे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय कुलकर्णी, आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच चे अध्यक्ष विश्वजित पाटील, कुपवाड मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, अमित गडदे, अमित देसाई, गणपती साळुंखे आदी विद्यार्थीनी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली