SANGLI
सांगलीची महापालीका ग्रामपंचायत करा...
राजे पटवर्धन यांची सांगली..
सांगली पुरातन कालापासून सहा गल्ल्याची सांगली झाली.. कृष्णा नदी काठी वसलेले हे गाव या सहा गल्ल्याच्या मारुती मंदिर हे गावाबाहेरच मंदिर.. नंतर सांगलीचा विकास होत गेला सांगली फार मोठ्या प्रमाणात विश्रामबागच्या पुढे पर्यंत वाढली.. इकडे माधवनगर व हरिपूर अंकली, पर्यंत सांगलीचा विस्तार झाला या विस्तारामध्ये तत्कालीन सांगली ग्रामपंचायत ही सातारा जिल्ह्याच्या आधीन दक्षिण सातारा म्हणून कार्यभार होता
...याचे ग्रामपंचायत ऑफिस व तलाठी ऑफिस आत्ताची जी शहर पोलीस स्टेशन समोर भारती विद्यापीठाची इमारत आहे त्या जागी होती... कालांतराने राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण ,वसंतराव दादा पाटील, राजारामबापू पाटील ,असे दिग्गज व प्रामाणिक नेत्यांनी सांगली साठी बरेच प्रयत्न केले ,सांगली वाढण्यासाठी एक एक प्रकल्प आणत गेले ,जसे सांगलीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना सांगली वसंतदादा साखर कारखाना, याचे नाव आजही घेतले जात आहे त्यानंतर कृष्णा नदीच्या पाणीसाठ्या साठी छोटे धरण म्हणजे बांधाऱ्याची निर्मिती , जुबली इलेक्ट्रिक वर्कशॉप सांगलीकरांसाठी जनरेटर वरून निर्मितीचा प्रकल्प, हिराबाग वॉटर वर्क्स सारखी सांगलीला स्वच्छ पाणी देण्यासाठी ची निर्मिती, सांगलीतील बऱ्याच प्रार्थमिक शाळा, हायस्कूल, पुढील नियोजन सांगली साठी केले गेले ..
काळ बदलत गेला.. मग सांगली ग्रामपंचायतची सांगली नगरपरिषद झाली या नगरपालिकेमध्ये त्यावेळी देविकुमार देसाई ,आण्णासाहेब गोटखिंडे, राजपूत साहेब, गलगले साहेब,प्रामाणिक म्हणणारे नेते धडपडत होते, काम करत होते सांगली त्यांच्या ताब्यात होती त्यावेळी एवढी गटतट व राजकीय विषमता नव्हती सांगलीसाठी सर्व पक्षाचे वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र येऊन सांगली साठी काहीतरी करायचं आहे म्हणून सांगलीच्या प्रगतीसाठी हे लोक एकत्र बसून आपल्या सर्वांच्या विचाराने निर्णय घेत असत..
परंतु या वीस वर्षे मागे मदनभाऊ पाटील यांच् राजकारण रोखण्यासाठी तत्कालीन मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगली मिरज कुपवाड एकत्र करीत सांगलीची महापालिका सांगलीकरांच्या वर लादली..
सांगलीची आर्थिक व भौगोलिक परिस्थिती आज देखील महापालिका लेवलची नाही परंतु आता महापालिका वरूनच लादलेल्या महापालिका क्षेत्रात नागरिक महापालिकेचे सर्व निकष डोक्यावर घेऊन चालत आहे याच्यामध्ये महापालिकेचे सर्व टॅक्सेस, त्याला येणाऱ्या खर्चाची सर्व बोजा, आता नागरिकांच्या डोक्यावर बसलेला आहे
ज्या वेळेला महापालिकेची निर्मिती झाली त्या वेळेला सांगलीकरांना वाटलं होतं की,या महापालिकेतून काहीतरी सांगली साठी चांगलं होईल ...परंतु या महापलीकडे कोल्हापूर,पुण्या सारखी
कोणतीही इंडस्ट्री, औद्योगिकता, औद्योगिक रचना नसल्यामुळे याच्या कडे फार कमी इन्कम गोळा होत आहे.. त्याच्या नंतर राजकारणातून सांगलीला दुय्यम वागणूक देण्यात आली व सांगलीचा विकास येथेच थांबला..
आताही सांगली महापालिका रुपी जुनी गाडी नवीन रंगरंगोटी करून चालवण्याची झाली तर ती खर्चिक बाब असल्याचे अधिकारी खाजगीत सांगतात ..
आता त्याच्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा ताफा, त्यांच्या गाड्या, त्यांचे पगार , ऑफिसेस हे सर्व फुकट खर्चास जातच आहे.. पण म्हणावा तसा सांगलीचा विकास होताना दिसत नाही
सांगलीच्या आयुक्तांपासून सर्व अधिकारी व शिपायापर्यंत याच्यामधून फक्त चमकोगिरी करूनच आम्ही काहीतरी केलं असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतात.. परंतु सांगलीचा विकास झालेला नाही..
त्यामुळे सांगलीमध्ये शामराव नगर सारख्या भागात पाणी तुंबणे, रस्त्यांची परिस्थिती , स्ट्रीट लाईट, साधे पिण्याच्या पाण्याच्या परिस्थिती , मोकाट जनावरे व कुत्र्यांची हल्ले रोज लहान मुलावर वृद्ध व्यक्ती वर होत आहेत परंतु हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जरासुद्धा लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे सुद्धा नागरिक हैराण आहेत
जुना जाणकार म्हणून माझं स्वतःचं असं मत आहे की, मुंबई जवळ ठाण्यामध्ये नक्की गाव सांगता येणार नाही... परंतु तिथे महापालिका झाली होती परंतु तिथल्या नागरिकांनी मंत्रालयात प्रयत्न करून त्या महापालिकेची ग्रामपंचायत करून घेतली होती ...असं एक उदाहरण मी महाराष्ट्रात ऐकलं होतं, अशाच प्रकारची सोय असेल तर महाराष्ट्र शासनाकडे सांगलीतील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सांगलीची ग्रामपंचायत करावी ,असा ठराव करून सांगलीला ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे माझे स्वतःच मत आहे..
सांगलीत कोणताही विकास महापालिका झाल्यानंतर झालेला आहे.. जर कोणी अस म्हणत असेल तर ती निव्वळ चमकोगिरी आहे..
त्या मुळे या सर्व अधिकाऱ्यांना शासन दरबारी परत पाठवून... येथे सरपंच ग्रामसेवक या पद्धतीने जर काम झाले तरी निदान सांगलीकरांच्यावर महापालिका म्हणून असलेला कर रुपाने, लादलेला बोजा कमी होईल व सांगलीचे सरपंच, ग्रामसेवक, आणि सदस्य ग्रामसभेचे व्यवस्थित काम करतील असं वाटते, त्यासाठी लोकसंदेश न्यूज मीडियाकडून सांगली ग्रामपंचायत करा अशी मागणी आम्ही सरकार दरबारी करीत आहोत...
संपादक;लोकसंदेश न्यूज मीडिया सांगली.
( याबाबतीच्या प्रतिक्रिया कृपया खालील नंबरवर पाठवा)
9850516355