माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना सांगली महापालिकेकडून अभिवादन
SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त महापालिकेकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त महापालिका मुख्यालयात महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपायुक्त चंद्रकांत आडके, जेष्ठ नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेवक संतोष पाटील, मनगुआबा सरगर, नगरसेविका अनिता व्हनखंडे, सविता मदने, गायत्री कल्लोळी, वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, मोहन कांबळे, प्रसाद जामसंडेकर, सर्जेराव काळोसे, भारती माळी, वैशाली सुर्यवंशी, सुमय्या मकानदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली