KOLHAPUR लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकणंगले येथे कुंभोज बेंदूर कमिटीच्या वतीने देशबेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मित्र असणाया बैलदेवतेकडे इडा पिडा टळु दे . बळीच राज्य येऊ दे ...हे मागणे महिलानी आवषण करुन केले. आज कुंभोज परिसरात अनेक ठिकाणी देशी बेंद्रा निमित्त बैलांचे उत्साही स्वागत करण्यात आले.
कुंभोज बेंदूर कमिटीच्या वतीने यावर्षी देशी बेंदराच्या मिरवणुकीचे सुंदर नियोजन करण्यात आले होते यावर्षी पाऊस काळ चांगल्या पद्धतीने झाल्याने कुंभोज परिसरातील शेतकरी गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बेंदराची मिरवणूक काढणे अशक्य झाले होते,
परिणामी यावर्षी कोरोना व पाऊस काळाने ही चांगली साथ दिल्याने आनंदी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कुंभोज आंबेडकर चौक, दीपक चौक ,मसुदी कट्टा मार्गे मोठ्या उत्साहात अनेक बैलजोडींच्या उपस्थितीत भव्य अशी बैलांची मिरवणूक डॉल्बीच्या गजरात काढण्यात आली.
ढोल ताशांचा आवाज सजवलेली बैले गुलालाची उधळण भगवे फेटे व हजारो शेतकरी महिला व पुरुषांची उपस्थिती बैलांची करण्यात आलेली सजावट व पावसाची रिमझिम यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते.
सदर बैलांची मिरवणूक कुंभोज दसरा मार्गे निघाली यावेळी अनेक ठिकाणी महिलांनी बैलांचे आवर्षण करून संपूर्ण देशावरील कोरोनाचे संकट टळू दे ,बळीच राज्य येऊ दे शेतकरी सुखी राहू दे, अशा आशियाचे मागणे बैल देवतेकडे केले.
सदर मिरवणुकीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ ,प्रकाश खोत ,विनायक पोद्दार संतोष भोकरे, दीपक पवार तसेच कुंभोज बेंदूर कमिटीच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली