तोतया कस्टम अधिका-यास सापळा रचून अटक
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई ; अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस.
KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
इचलकरंजी येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगत ऑक्शनमधील इम्पोर्टेड गाड्या व वस्तू कमी देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणार्या मुंबई येथील मनिष प्रभाकर आहिरे याला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
मुंबई येथील मनिष आहिरे याने आपली पत्नी अर्चना ही कस्टम खात्यात नोकरीस असल्याचे सांगत कस्टम खात्याकडून जप्त करण्यात आलेल्या इम्पोर्टेड गाड्या, ब्रॅण्डेड दुचाकी व चारचाकी तसेच स्क्रॅप मटेरियलसह अन्य वस्तू कमी किंमतीत देतो असे सांगत अनेकांकडून पैसे घेतले आहेत. अशा पध्दतीने या तिघांनी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांसह नागरिकांचा समावेश आहे. या तिघांवर काशिमीरा पोलिस ठाणे, चितळसर पोलिस ठाणे व कोपरी पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. यापैकी मनिष आहिरे हा इचलकरंजी येथील जनता चौक परिसरात येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने श्री. वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ओतारी यांनी जनता चौकात सापळा लावून मनिष आहिरे याला अटक केली. त्याला कोपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर चितळसर पोलिसांनी यापूर्वीच योगेश आहिरे याला अटक करण्यात आली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली