RATNAGIRI
राजापूर लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.
राजापूर तालुका नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत संपन्न.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती घेण्यासाठी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत राजापूर उप विभागीय कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी सतर्क रहावे, आपदग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी यांच्या मालमत्तेचे तसेच शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशा सूचना त्यावेळी भुस्खलनाचा धोका असलेल्या धोपेश्वर खंडेवाडी, बौध्दवाडी येथील कुटुंबांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे यावेळी तहसीलदार श्रीम.जाधव यांनी सांगितले. तसेच तहसील कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पावसळ्यात दरडी कोसळल्यास, झाडे मोडून रस्त्यावर पडल्यास तात्काळ मदत कार्यासाठी 11 जेसीबी तैनात ठेवण्यात आल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
गतवर्षी पावसाळ्यात नादुरूस्त झालेल्या ओणी अणुस्कूरा रस्त्यातील अणुस्कूरा घाटाच्या पायथ्यापर्यंतचे खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पावसाची उघडीप मिळताच उर्वरित खड्डे बुजविण्याच्या सूचना शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी यावेळी दिल्या. तसेच सौंदळ येथील रस्त्याची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहितीही बांधकाम विभागाने दिली. अर्जुना प्रकल्पाचा कालवा फुटल्याने सुमारे अडीज हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती कृषि विभागाच्या वतीने देण्यात आली.
तसेच कोदवली आगरवाडी येथील ट्रान्स्फार्मर जळाल्याने पाणी योजना बंद पडली असून तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या. राजापूर शहरातील पुरस्थितीत बचाव कार्यासाठी दोन फायबर बोटी तैनात करण्यात आल्याची माहिती न.प.पशासनाने दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱया साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागही सतर्क असल्याने अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राहिलेल्या तृटी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, पावसाळ्यात काही ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून त्यावर वेळोवेळी उपाय-योजना करण्याच्या सूचना शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिल्या.
यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन करत असलेल्या कामगिरीचे कौतुक केले. त्याप्रसंगी उप विभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, प.गटविकास अधिकारी सुहास पंडीत, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस.साळुंके, विस्तार अधिकारी एम.के.जाधव, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता एस.एस.दुधाडे, तालुका कृषि अधिकारी अनिल गावित, राजापूर आगार वाहतूक निरीक्षक सचिन मोरे, सुबोध बाकाळकर, प. गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, पशुधन अधिकारी प्रमोद सुर्वे, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जि.प.बांधकाम विभागाचे आर.ए.पाटील, पी.आर.उरणकर, आरी. डी. मासये, एस.वाय.भालेकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे प.ला.महाडवाला, भुमि अभिलेखचे प.पां.दळवी, राजापूर नगरपरिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली