SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली
महाराष्ट्रात चर्चित म्हैशाळ प्रकरणातील नऊ जणांच्या हत्याकांडामध्ये सहभागी असणारे सावकार शिक्षक निलंबित. ...
सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील नऊ जणांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी १३ सावकारांना अटक केली होती.
यामध्ये मिरज तालुक्यातील विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल बोराडे, शुभदा कांबळे आणि शिक्षक बँकेचे नूतन संचालक शामगौंडा पाटील यांना अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी या तीनही शिक्षकांना निलंबित केले.
संबधित शिक्षकांना पलूस पंचायत समिती येथे हजेरी लावण्यासाठी आदेश दिले आहेत.
म्हैसाळ प्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी २५ सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. .. या प्रकरणांमध्ये अटक केलेल्यामध्ये विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. या मधील शिक्षकांवर निलंबनाची कारवाई आज करण्यात आली
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली