डॉक्टर डे दिनी प्रसूतिगृहातील महिला डॉक्टरांचा सत्कार
SANGLI
लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी.
सांगली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती सदस्यांनी प्रसूतिगृहातील महिला डॉक्टरांचा सत्कार करीत डॉक्टर डे साजरा केला.
यावेळी महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, माजी महापौर संगीता खोत, प्रभाग सभापती गायत्री कल्लोळी, नगरसेविका सविता मदने, कल्पना कोळेकर, अनिता व्हनखंडे , सुनंदा राऊत यांच्याहस्ते
मनपा प्रसूतिगृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता पवार, डॉ. श्वेता वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालरोगतज्ञ डॉ उज्वला गवळी याही उपस्थित होत्या. तसेच सर्वाना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली