BRONOI
ब्रूनेईच्या सुलतानाकडे सोन्याचे विमान........एकवीस लाख चौरस फूटातील राजमहालाची गिनीज बुकमध्ये नोंद........
बंदर सेरी बेगावन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावांची चर्चा सुरू झाल्यावर आपोआपच ब्रुनेईच्या सुलतानाचे नाव आघाडीवर येते..... कारण आजही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन या सुलतानाचीच नोंद आहे. 75 वर्षीय हसन बेलकियाह हे सध्या सुलतान असून त्यांच्या श्रीमंतीच्या कहाण्या सतत चर्चेमध्ये असतात नवीन मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सुलतानाकडे सध्या सोन्याचे मोठे विमान आहे. या विमानाची किंमत अब्जावधी रुपये आहे.
विमानातील अनेक गोष्टी सोन्याच्या साह्याने सजवण्यात आल्या असून हे विमान सुशोभित करण्यासाठीच 95 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियातील सुलतान यांच्याकडे जरी सोन्याच्य गाड्या असल्या तरी सोन्याचे विमान ठेवणारा हा एकमेव सुलतान आहे. सुलतानाने ब्रुनेईमध्ये जो राज महाल बांधला आहे त्याचीही नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
तब्बल एकवीस लाख चौरस फुटामध्ये या भव्य राज महालाचे बांधकाम करण्यात आले आहे. या भव्य राजमहाला मध्ये सतराशे खोल्या पाच मोठे स्विमिंग पूल आणि 217 बाथरूम आहेत या रज महालाचे घुमट सोन्यापासून मढवले आहेत. राजमहाला लागून 110 गॅरेज असून त्यामध्ये सुलतान आपल्या सर्व किमती गाड्या ठेवतात सुलतानाकडे तब्बल सात हजार गाड्या आहेत.
त्यामध्ये 365 फरारी 270 लेम्बोर्गिनी 258 अॅस्टन मार्टिन आणि दीडशेपेक्षा जास्त बुगाटी कार्स आहेत. याशिवाय पोर्श बेंटले मर्सिडीज यासारख्या अनेक महागड्या कारचा ताफा या सुलतानाकडे आहे. सुलतानाने स्वतःसाठी एक
प्राणीसंग्रहालय तयार केले असून त्यामध्ये तीस बंगाली टायगरही आहेत. 1967 मध्ये ब्रूनेईची सत्ता सांभाळणाऱ्या विद्यमान सुलतानाची आजची संपत्ती 30 अब्ज पौंड एवढी प्रचंड असून त्यामध्ये सतत वाढ होत आहे
आमच यूट्यूब चैनल व व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर व कमेंट करा ...
https://youtube.com/c/LoksandeshNews
कदाचित यामुळे आपणही ब्रोनोई राजा सारखे संपत्तीचे मालक होऊ शकाल... धन्यवाद...