वृत्तपत्र विक्रेता राज्य संघटना संचालकपदी सांगलीचे विकास सूर्यवंशी, सचिन चोपडे
- राज्य सल्लागार पदासाठी मारूती नवलाईंची शिफारस
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यकार्यकारणीत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून...
सचिन चोपडे
विकास सूर्यवंशी व सचिन चोपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर
मारूती नवलाई यांची राज्य संघटनेच्या संघटक सल्लागार पदी निवड करण्याची शिफारस करणारा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनची बैठक नुकतीच वृत्तपत्रविक्रेता भवन येथे संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची निवडणूक प्रक्रीया सध्या सुरू आहे. या निवडणूक अंतर्गत सांगली जिल्ह्यातुन दोन प्रतिनिधींची राज्य संघटना संचालकपदी निवड करण्याचा विषय या बैठकीच्या अजेंडावर होता. त्यानुसार बैठकीस उपस्थित पदाधिकारी व विक्रेते यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली.
उपस्थित सर्वानुमते विकास सूर्यवंशी यांची सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून फेर निवड करण्यात आली तर सचिन चोपडे यांना नव्याने संधी देण्यात आली. राज्य संघटनेचे विद्यमान संचालक मारूती नवलाई यांची राज्य संघटनेच्या संघटक सल्लागार पदी निवड करण्यात यावी अशी शिफारस करण्यारा ठरावही यावेळी करण्यात आला.
बैठकीस संघटक व माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, मा. मनपा क्षेत्र अध्यक्ष दत्तात्रय सरगर, सागर घोरपडे, शिवाजी जाधव, धनाजी सूर्यवंशी, नानासो बोंगाणे, हणमंत जाधव, चंद्रकांत जोशी, सुरेश गायकवाड, दिपक सूर्यवंशी, अनिकेत गंभिर,आदी वृत्तपत्र विक्रेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली