KOLHAPUR
लोकसंदेश कोल्हापूर शहर प्रतिनिधी,
घरातील भांडणाचा राग बाहेर उभ्या असलेला महागड्या कार वर काढला ..... मध्यपी तरुणाचा पराक्रम.....
कोल्हापूर मंगळवार पेठेतील
एका मद्यपी तरुणाने रस्त्याकडेला पार्क केलेल्या 12 मोटार कार लोखंडी रॉडने फोडून नुकसान केले.
या घटनेचा आजूबाजूतील परिसरांतील वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. .. ही घटना काल दिनांक 22/7/2022 शुक्रवारी रोजी मध्यरात्री मंगळवार पेठेतील पद्मावती मंदीर परिसरात घडली.
या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी नशेबाज तरुण स्वप्नील तावडे वय २५ पद्मावती मंदीर परिसर कोल्हापूर याला अटक केली आहे
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पद्मावती मंदीर परिसरातील नागरीक आपल्या मोटारी महाराणी ताराराणी उद्यानाच्या मागे रिंगरोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या करतात. यातील काही मोटारी स्वप्नील तावडे याच्या घरासमोरच पार्क होत असल्याने त्याचा राग होता...तेथील काही मोटार मालकांशी याबाबतीत बऱ्याच वेळा वाद देखील झाला होता..
मात्र काल स्वप्नील मद्यप्राशन करुन घरी आला असता घरात वाद झाला. या रागातूनच त्याने लोखंडी रॉडने सुमारे १२ मोटारींच्या काचा फोडून नुकसान केले.
हा प्रकार आज शनिवारी सकाळी निदर्शनास आला. या नंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आपल्या टीम सह घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व चौकशी अंती संशयावरुन स्वप्नील तावडे याला अटक केली..पुढील तपास राजवाडा पोलीस करीत आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली