कुत्र्याच्या हल्ल्यात शेळी आणि घोडा ठार; नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेरावा : महापालिकेत कुत्री सोडण्याचा नागरिकांचा इशारा.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कुत्र्याच्या हल्ल्यात शेळी आणि घोडा ठार; नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेरावा : महापालिकेत कुत्री सोडण्याचा नागरिकांचा इशारा.



कुत्र्याच्या हल्ल्यात शेळी आणि घोडा ठार; नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेरावा : महापालिकेत कुत्री सोडण्याचा नागरिकांचा इशारा.


सांगली शहरासह मुजावर प्लॉटमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुमारे 20 ते 25 मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मंगळवारी १ शेळी व घोडा ठार झाला. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


यावेळी घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या वैद्यकीय अधिकारीरवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अविनाश यांना नागरिकांनी घेराव घातला.


महापालिकेने आठ दिवसाच्या आत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास सांगलीत सर्व संघटनांच्या मदतीने महा आंदोलन व कुत्री महापालिकेत सोडण्याचा इशारा जेष्ठ नागरिक सलीम नदाफ व संतप्त नागरिकांनी दिला.

अधिक माहिती अशी...

सांगलीतील मुजावर प्लॉट या ठिकाणी मंगळवारी 25 ते 30 भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात शेळी आणि घोड्यावर जीव घेणे हल्ला करण्यात आला. त्यामुळे शेळी व घोड्याचे मोठ्या प्रमाणात लचके तोडल्याने ते जागीच ठार झाले.


या बाबतची माहिती नागरिकांनी या घडलेल्या प्रकाराची माहिती महापालिका प्रशासनास दिल्याने महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.


  यावेळी मुजावर प्लॉट मधील संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यता महापालिकेत कुत्रे सोडू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.

शेळीची मालकीण दौलतबी मुजावर

यावेळी नगरसेवक मंगेश चव्हाण ,युवा नेते ताजुद्दीन शेख,व ज्येष्ठ नागरिक सलीमभाई नदाफ यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली