पंतप्रधान मोदीजींना खालच्या पातळीवर आंदोलनातुन व घोषणाबाजीतुन शिवीगाळ करणारे काँग्रेस नेते व कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करणेस लेखी फिर्याद...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंतप्रधान मोदीजींना खालच्या पातळीवर आंदोलनातुन व घोषणाबाजीतुन शिवीगाळ करणारे काँग्रेस नेते व कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करणेस लेखी फिर्याद...



SANGLI 
पंतप्रधान मोदीजींना खालच्या पातळीवर आंदोलनातुन व घोषणाबाजीतुन शिवीगाळ करणारे काँग्रेस नेते व सर्व कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करा: दीपक शिंदे 

दिनांक २०.०७.२०२२ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात खादयपदार्थावर जी.एस.टी लागु केल्यामुळे किरकोळ व्यापारी संपुष्टात आले आहेतअस म्हणत त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने झाशी चौकात निदर्शने करण्यात आली



यावेळी जमलेल्या कॉंग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी देशाचे पंतप्रधान मोदींजींच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह घोषणा दिल्या आहेत. सदर घोषणेमध्ये " केंद्र सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय" या "मोदी भडव्या सरकारचे करायचे काय"  व या "भडव्या हरामखोर मोदीचे करायचे काय??" अशा अत्यंत खालच्या पातळीवर घोषणाबाजी केली आहे.

देशाच्या पंतप्रधानाबाबत केलेली घोषणा ही अत्यंत आक्षेपार्ह असून या घोषणेमुळे आमची मने दुखावली गेली आहेत. नवीन कायदयानुसार असे जाहीर व्यक्तव्य भाषणातुन अथवा घोषणेबाजीतुन करता येणार नाही



 त्यामुळे सदर काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या सदर व्यक्तींच्या विरोधात आमची तक्रार असुन वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नेते यांच्यावर वरील कारणासाठी गुन्हा दाखल करावा या साठी दिपक शिंदे संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सांगली व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज सांगली शहर पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांना दिले

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली