SANGLI
लोकसंदेश न्यूज पलूस प्रतिनिधी
आढावा बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सांंगली जिल्हा अध्यक्ष मा.पृथ्विराज बाबा देशमुख व सांगली जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मा.संग्राम भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पलुस तालुक्यात पक्षबांधणी मजबुत करण्याच्या संदर्भात कार्यकारणी आढावा बैठक झाली
बैठकीस सुरवातीला महालक्ष्मी सुत गिरणीच्या संचालक पदी मा.जयवंत आबा मगर-पाटील यांची निवड झालेबद्दल आणी प्रधानमंत्री कल्याणकारी योजनांच्या माध्यमातुन सर्व सामान्य नागरीकांना अंदाजित 1 कोटी पर्यंतचा लाभ मिळवुन दील्याबद्दल मा.आमिर (भैय्या) पठाण यांचा सत्कार कार्यकारणीच्या वतीने करण्यात आला.
त्यानंतर प्रत्येक गावातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली या प्रसंगी पलुस तालुक्यातील अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली