कबनूर नगरपरिषद होणे संदर्भात कबनूर ग्रामपंचायत प्रशासन विरोधात दर्गा चौक येथे धरणे आंदोलन सुरू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कबनूर नगरपरिषद होणे संदर्भात कबनूर ग्रामपंचायत प्रशासन विरोधात दर्गा चौक येथे धरणे आंदोलन सुरू



ICHALKARANJI

लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी उमर फारूक तांबोळी यांचा रिपोर्ट

कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी जवळच गाव कबनूर ...औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीवर असणारे मँचेस्टर नावाने ओळखले जाणारे इचलकरंजी शहरा जवळचं लगतच गाव...परंतु कबनूर कडे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले आहे.. कित्येक आमदार ,खासदार निवडून आले ते या भागातूनच ..परंतु कबनूरकरांची शोकांतिका काही संपली नाही... ग्रामपंचायत असल्यामुळे कबनूर गावाचा विकास थांबलेला आहे... ग्रामपंचायतीला फंड नसल्यामुळे कबनूर शहराच्या प्रगतीची वाटचाल शून्य आहे म्हणून नगरपरिषद करावी अशी मागणी करत आज येथील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे


कबनूर नगरपरिषद होणे संदर्भात कबनूर ग्रामपंचायत प्रशासन विरोधात कबनूर रत्नाप्पा कुंभार चौक दर्गा कट्टा धरणे आंदोलन सुरू करण्यात सुरवात असून आज त्याचा पहिला दिवस...


शासनाने या गावच्या विकासासाठी त्वरित लक्ष द्यावे... अन्यथा हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे..

यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रवी जावळे व कबनूर गावचे युवा उद्योजक श्री उदय कदम यांनी कबनूर नगर परिषदेस पाठिंबा दिला यावेळी उपस्थित दत्ता पाटील,प्रा शरद कांबळे सर,रियाज चिकोडे, जावेद फकीर, अजित खुडे, बाळू कामत,रवी धनगर, शकील मुल्ला, नितीन गवळी,उत्तम जाधव, युवराज कांबळे, राहुल महालिंगपुरे, गणेश रेणके, कुंदन आवळे इमरान सनदी शकील मुजावर, जावेद मुजावर, विष्णू चव्हाण मामा, दत्ता शिंदे व नागरिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली