KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर विनोद शिंगे
संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी चे जेईई मेन्स- जून २०२२ परीक्षेत घवघवीत यश
९९ पर्सेन्टाइलच्या वरती २० विद्यार्थी..
जेईई, सीईटी, एम्स व नीट या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम राखत संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमी च्या २० विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स-जून २०२२ या परीक्षेत ९९ पर्सेन्टाइल च्या वरती गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये अकॅडमीच्या ओमकार भंडारे -९९.८९, देव छेडा- ९९.८२ , प्रियांशु मणियार- ९९.७५, आर्या आळवेकर- ९९.६३, देवांग पटवर्धन- ९९.६२, ओमकार चौगुले -९९.५३, गायत्री मोघे - ९९.५२, वरुण साबु- ९९.५०, वरद जाधव - ९९.४९, सुमेध गणपते -९९.४१, कुलदीप पुजारी-९९.२८, सलोनी शिंदे -९९.२७, प्रणील पुणेकर-९९.२६, ऋषिकेश मोरे-९९.२४, तन्मय किल्लेदार -९९.२४, साहिल म्हापसेकर-९९.१३, ओमकार पवार -९९.१२, अथर्व कुलकर्णी-९९.०५, सुरभी बांगड-९९.०२, पार्थ जगताप-९९.०१ पर्सेन्टाइल गुण प्राप्त करून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
याबद्दल बोलताना संचालक श्री.वासू म्हणाले '' आयुष्यात ध्येय निश्चित करून आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर कोणतेही यश सहज प्राप्त करू शकतो हे या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालावरून दाखवून दिले. ९९ पर्सेन्टाइलच्या वरती आमच्या अकॅडमीच्या २० विद्यार्थ्यांनी गुण मिळविले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही होणाऱ्या जेईई मेन्स तसेच ऍडव्हान्स परीक्षेतही या अकॅडमीचे विद्यार्थी चमकतील असे बोलून त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले''
याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी ही सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, संचालक वासू सर व त्यांची पूर्ण टीम यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली