MUMBAI
शिंदे गट आणि भाजपचे 'या' मुद्द्यावर पटेना !
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरलेल्या अपशब्दाचा शिंदे गटातील आमदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'माफिया' असा केला. याच शब्दाला विरोध दर्शवत आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदेंचे अभिनंदन करत सोमय्या यांनी एक ट्विट टाकले होते. यात त्यांनी "मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अस म्हंटले आहे.. परंतु
"माफिया मुख्यमंत्र्यांना" हटवल्याबद्दल अभिनंदन केले" असे लिहिले होते.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नसल्याचे ठणकावून सांगितले आहे .अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर सोमय्या यांनी "अशा प्रकारची प्रतिक्रिया आपापल्या पक्षाचे लोक देत असतात. त्यावर मी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही' असे सांगितले. "मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं आणि ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता, ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. मनसुख हिरेनची हत्या झाली. ही एक प्रकारची माफियागिरी होती. त्याचे कुटुंब हत्या करणाऱ्याला माफिया म्हणणार", असे ते म्हणतात.
भाजप आणि शिंदे गटातील हि धुसफूस हळूहळू वाढून काही नवीन वाद समोर येतील असेच काहीतरी येत्या दिवसात दिसतील असे वाटते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली