MUMBAI
प्राध्यापक हरी नरके यांचे महाराष्ट्रातील राजकारणावर सडेतोड विचार.... व महाराष्ट्राचे नव निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला...
महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी साम्राज्यात आपल्या राजाशी सरदारांनी फितूरी केल्याच्या अनेक घटना आहेत. शिवाजी महारांजाच्या इतिहासात तसेच पेशव्यांच्या इतिहासात त्याचे अनेक दाखले मिळतात. आपण इतिहासातून काय शिकत नाही, असे मत प्राध्यापक हरि नरके यांनी मांडले आहे.
हरि नरके यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना इतिहासातील घटनांचा दाखला देत झणझणीत सल्ला दिला आहे.
पेशव्यांच्या आदेशावरून दत्ताजी शिंदे ताबडतोब निघून मल्हारराव होळकरांकडे गेले. 'पेशव्यांचे दुश्मन
रोहील्याला खतम करायचे आहे, त्वरित निघुन या 'असे होळकरांना म्हणाले होते. त्यावर मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदेना सांगितले की, शिंदे, जोवर शत्रू जिवंत आहे, तोवर पेशव्यांना तुमची गरज आहे. रोहिले संपले की, पेशवे तुम्हाला भांडी घासायला नी धोत्रे धुवायला ठेवतील. हीच परिस्थती आज महाराष्ट्र राज्यात घडत आहे. या बंडखोर नेत्यांना मोदी, शहा, फडणवीस हे गरज असेपर्यंत वापर करून घेतील. त्यानंतर त्यांना हाकलून देतील. केवळ अडीच वर्ष सत्ता उपभोगण्यासाठी त्यांचा वापर करतील. बंडखोर आमदारांवर कृपाकरुन, त्यांच्यावर उपकार करुन त्यांना आपल्या छत्राखाली राबवून घेतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचा राग आहे. केवळ हे दोन्ही काँग्रेस संपवणे आणि काँग्रेसमुक्त महाराष्ट्र तयार करणे हाच भाजपचा अजंडा आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेतील मंत्री फोडण्याचा घाट घातला. त्यासाठी इतिहासातील दाखले विचारात घ्यायला हवे, असे मत प्राध्यापक हरि नरके यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात महाभारत सुरु आहे. भाजपने आपला शत्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला हटवण्यासाठी शिवेसेनच्या आमदारांशी हातमिळवणी करून बंड करण्यास भाग पाडले. त्यानंतर खूप रणकंदन माजले. सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले. तरी देखील ‘और लढेंगे' चा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला आहे. तो केवळ स्वाभिमानी आणि एकनिष्ठ शिवसैनिकांवर विश्वास असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितले.
गुजरात्यांच्या हातात देश...
दोन गुजराती देश चालवत आहेत. तर दोन विकत आहेत. आपला देश मोदी, शहा चालवत आहेत. हे जनतेपासून लपून राहिलेले नाही. तर दोन मोठे गुजराती उद्योजक देश विकत आहेत हे देखील जनतेपासून लपून राहिलेले नाही.
या गुजराती माणसांना मुंबई
पळवायची आहे. या गुजराती माणसांना मुंबई गुजरातमध्ये न्यायची आहे. पण ते करण्यासाठी शिवसेना अडसर ठरते आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई गुजरातमध्ये न नेण्यासाठी लढा दिला होता.
त्यावेळेपासून मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याचा गुजराती नेत्यांचा प्रयत्न आहे. मुंबई किमान केंद्रशासित करायची आहे. पण शिवसेना हा मोठा अडथळा आहे. त्यामुळे त्यांनी काट्याने काटा काढला.
एकनाथ शिंदेना हाताशी धरुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंना कमजोर करण्याचा प्रयत्न भाजपने केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने तीच्यावर कब्जा करण्याचा गुजराती नेत्यांचा डाव आहे. हे माहित असून देखील एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार शत्रूच्या पक्षात गेले. ही एक प्रकारची फितूरीच आहे.
1960 पासून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कपट कारस्थान सुरु आहे. मुंबईला गुजराती उद्योजकांनी ग्रासले होते. त्यांच्याकडे मराठी माणूस नोकरी करत होते. त्याची चाकरी करत होते.
मात्र जीआयडी तयार झाल्यानंतर मुंबईतल्या अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेल्या आणि काही प्रमाणात मराठी माणसांची गुजरातींची चाकरी करण्याचे प्रमाण घटले. हा इतिहास प्रत्येक शिवसैनिकाला माहित आहे. तरी देखील ईडीची कारवाई टळावी. तसेच आणखी मलीदा खायला मिळावा, यासाठी शिवसेनेतील नेत्यांनी बंडखोरी केली.
नव्याचे नऊ दिवस संपले की, भाजप आपला रंग दाखवायाला सुरुवात करेल ...यात शंका नाही. फितूर झालेले शिंदे आणि फडणवीस तुम्हाला त्यांचा दास बनवतील. भाजप धार्जिणे धोतर परिधान करून हिंदूत्वाचा आव आणणारे राज्यपाल देखील या फितूरांना सामील आहेत. ही गोष्ट देखील जनतेपासून लपून राहिलेली नाही. राज्यपाल हे संविधानीक पद असून, तो कोणत्याही पक्षाचा नसतो. मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आल्यापासून सगळेच बदलले आहे.
आता येणारा काळच या आमदारांचे भवितव्य ठरवेल. भाजपने बंडखोर आमदारांना फितूर करुन आपल्या पक्षात ओढून नेले आहे. मात्र आगामी निवडणुकीत यांची भाजप कशी हालत करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
___________________________
लेखक प्रा. हरी नरके
____________________________
कोण आहेत प्रा. हरी नरके ? हरि नरके हे मराठी लेखक, अभ्यासू संशोधक वक्ते आणि मराठी ब्लॉगर आहेत. पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहेत. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर ते उपाध्यक्ष आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली