SANGLI
लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी.
मिरज शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईद आषाढी एकादशीच्या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक
बकरी ईद व आषाढी एकादशी दोन्ही सण एकत्रित येत आहेत या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बैठक घेऊन दोन्ही सणाच्या शुभेच्छा देऊन दोन्ही सण सर्व धर्मियांनी शांतते व गुण्या गोविंदाने साजरे करावेत असे मिरज पोलीस निरीक्षक राजू सावंत्रे यांनी सांगितले तसेच पोलीस निरीक्षक सावंत्रे यावेळी अनेक सूचना देखील कार्यकर्त्यांना दिल्या
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी ही आपल्या सूचना मांडल्या यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान,विरोधी पक्षनेते संजय मेंढे,नगरसेवक पांडुरंग कोरे व नगरसेवक गजेंद्र कल्लोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख, भारतीय जनता पार्टीचे मिरज शहर अध्यक्ष, बाबासाहेब आळतेकर, मोहन वाटवे,राजाभाउ जोशी,मराठा महासंघाचे विलास देसाई,धनंजय हळकर, शिवसेनेचे महादेव गाडगीळ, मौलाना इजाज कादरी, दर्गा खादिम जमातीचे अजगर शारिकमसलत आदीसह मिरजेतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली