महावितरण सांगली विभागा तर्फे सांगली व विटा येथे शनिवारी ''उज्वल भारत_ व "उज्वल भविष्य'' अंतर्गत महोत्सवाचे आयोजन. : धर्मराज पेठकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महावितरण सांगली विभागा तर्फे सांगली व विटा येथे शनिवारी ''उज्वल भारत_ व "उज्वल भविष्य'' अंतर्गत महोत्सवाचे आयोजन. : धर्मराज पेठकर



SANGLI 
लोकसंदेश सांगली प्रतिनिधी

महावितरण सांगली विभागा तर्फे सांगली व विटा येथे शनिवारी ''उज्वल भारत_ व "उज्वल भविष्य'' अंतर्गत महोत्सवाचे आयोजन.... : धर्मराज पेठकर



आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावर 'उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत सांगली व विटा येथे हे विशेष कार्यक्रम होणार आहेत.




राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. २५ ते ३० जुलै २०२२ या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 




या महोत्सवात ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा मागोवा घेऊन ऊर्जेचे भविष्यकालीन २०४७ पर्यंतचे नियोजनाचा वेध घेण्यात येणार आहे.

 सांगली जिल्ह्यात दि. ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता अभियंता भवन, आनंदवन गार्डन शेजारी, विश्रामबाग, सांगली व दुपारी ३ वाजता लीलाताई देशचौगुले विद्यामंदिर, विटा येथे हा कार्यक्रम आहे. 

यावेळी खा. संजय पाटील, खा. धैर्यशील माने, आ. मोहनराव कदम, आ. अरुण लाड, आ. गोपीचंद पडळकर, आ. जयंत पाटील,आ. सुरेश खाडे, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, आ. विश्वजित कदम, आ. सुमन पाटील, आ. मानसिंग नाईक, आ. विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. मतांडा राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य अभियंता परेश भागवत, एन.टी.पी सी  लि. नोडल अधिकारी विजेंद्रकुमार मीना यांची उपस्थिती असणार आहे.



    जनजागृती अभियान राबविणार ; धर्मराज पेठकर
गेल्या आठ वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या सौभाग्य, दीनदयाल ग्रामज्योती, एकात्मिक ऊर्जा विकास, प्रधानमंत्री कुसुम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश, मुख्यमंत्री सौर कृषिपंप, उच्चदाब वितरण प्रणाली - कृषीपंपांना वीजपुरवठा, कृषिपंप वीज जोडणी धोरण- २०२०, जिल्हा नियोजन व विकास समिती निधी इ. योजनांच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रातील विकास कार्यक्रम, ग्राहकाधिकार बाबत या महोत्सवात पोस्टर्स, चित्रफिती, पथनाट्याव्दारे जनजागृती केली जाणार आहे. विविध योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागाचे आवाहन नोडल अधिकारी तथा अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे 
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली