लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी.
पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे यासह एका आरोपीस अटक.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टा ते बागणी रोडवरील जायंट्स हॉलचे समोरील रस्त्यावर संध्याकाळी सहाच्या सुमारास आष्टा पोलिसांनी आरोपी विशाल आनंद शिंदे, वय 29 वर्ष, राहणार घुणकी, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या आरोपीस पकडून त्याच्याकडून विनापरवाना असलेले एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस अटक केली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम सो, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम यांचे आदेशाने
व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर , पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर पोलीस अंमलदार मेघराज रुपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून आला असून पुढील तपास आष्टा पोलिसांच्या कडे सोपवण्यात आला आहे