KOLHAPUR
लोकसंदेश प्रतिनिधी; विनोद शिगे
वारणा धरण क्षेत्रासह खोची परिसरात एक आठवडा पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खोचीसह परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणी पातळीत रविवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली.त्यामुळे प्रथमच नदीपात्रा बाहेर पाणी पडले. तसेच खोची- दुधगाव बंधारा प्रथमच पाण्याखाली गेला.त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.पर्यायी मोटरसायकल वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे. या ठिकाणाहून अजून चार चाकी वाहने रस्त्याचे काम चालू असल्याने जात नाहीत.
त्यामुळे त्यांना पर्यायी कुंभोज,हातकणंगले,आष्टा मार्गे चालू झाली आहे.दरम्यान या पावसामुळे या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.नदीकाठची शेत जमीन पाण्याखाली जाऊ लागल्याने या ठिकाणी असलेला जनावरांचा चारा पाण्यात बुडू लागला आहे.त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरी वर्गाला भेडसावू लागला आहे.दरम्यान सुरू असलेला पाऊस,पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहून
संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी वस्ती असलेले नागरिक सावध झाले आहेत.या परिस्थितीवर महसूल, ग्रामपंचायत,पाटबंधारे विभाग,पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे.
शासकीय अधिकाऱ्यानी या पूर परस्थिती बाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ,मुंबई सांगली