अन्नधान्यावर जी.एस.टी.विरोधातच्या व्यापारी संघटनांच्या देशव्यापी बंदला सांगली व्यापाऱ्यांचा जाहीर पाठिंबा;
SANGLI
लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी
सांगलीसह सर्व मार्केट यार्ड मधील दहा कोटीची उलाढाल ठप्प.
पॅकबंद शेतमाल व धान्यावर पाच टक्के जीएसटीच्या प्रस्तावाविरोधात व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सांगली जिल्ह्यात देखील मोठा प्रतिसाद मिळाला.
सांगली मार्केट यार्ड सह जिल्ह्यातील सर्व मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आलेत. यामुळे या बंदमुळे जिल्ह्यात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झालेत. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र व शासनाकडून पाच टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे.
सदरबाबतचे नोटीफिकेशन दि. १३ जुलै २०२२ रोजी काढले आहे. व दि. १८ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यात्र व जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा परिणाम व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामध्ये अन्नधान्य, गूळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली