मिरज येथे मच्छी व मटन मार्केटमध्ये जोरदार वाद व हाणामारी...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मिरज येथे मच्छी व मटन मार्केटमध्ये जोरदार वाद व हाणामारी...


मिरज येथे मच्छी व मटन मार्केटमध्ये जोरदार वाद व हाणामारी...

SANGLI
लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी,

सांगली लगत असलेल्या मिरज मच्छी व मटन मार्केट मध्ये १०० वर्षे झाली या मार्केटची दुरुस्ती झाली नव्हती ... येथील व्यापाऱ्यांच्या  मागणीनुसार आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने या मच्छी व मटण मार्केट साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे व त्याच्या भूमिपूजन पूजनाचा कार्यक्रम आज दोन्ही मार्केटचे व्यापारी, सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्तें सह पार पडला...




 भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मच्छी मार्केट पाडून नवीन बांधण्याचे असल्याने तेथे पाडापाडीचे काम सुरू झाल्यानंतर एका गटाने या पाडापाडी विरोध करत येथे गोंधळ घातला .... हे मार्केट मोठे व चांगले अत्याधुनिक होत असल्याचे सांगत दुसऱ्या गटाने त्यांना विचारणा केली असता हा वाद वाढत गेला. . आणि याचे रूपांतर मारामारी व हाणामारीमध्ये झाले... दोन्ही गटाच्या बाजूने मिळेल ती हत्यारे व दगड विटांचा जोरदार मारा करण्यात आला ..




 ही बाब मीरज शहर पोलीसाना समजल्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सावंत्रे साहेब  व त्यांची कुमुक येथे दाखल झाली .. 


त्यांच्यासमोर सुद्धा हा वाद सुरू होता त्यांनी दोन्ही गटांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या बाळाचा वापर करत या दोन्ही गटाच्या काही लोकांची धरपकड करत त्यांच्यावर लाठीमार केला व ही गर्दी पांगवली..

 हा वाद आत्ताचा नसून यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून व्यावसायिक स्पर्धा व हेवेदाव्यातून हा प्रकार घडल्याचे समजून येत आहे. ज्यांनी हा वाद उकरून काढला त्यांचे म्हणणे असे होते की, यामध्ये आपल्याला परत भाडेपट्टा वाढणार आहे त्यामुळे हे मार्केट होऊ नये असे त्यांचे मत होते ,तर दुसऱ्या गटाचे म्हणणे अस होतें की, अत्याधुनिक मार्केट मिरजे मध्ये होत आहे ,सर्व सुविधा आपणास शासन देत आहे, तर हे मार्केट बांधण्यास काय हरकत आहे !!

आता या भागात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवलेला आहे, अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली