सांगलीतील सह्याद्री मोटर्समध्ये महिंद्रा ॲन्ड महिंद्राच्या नव्या 'स्कॉर्पिओ एन' या एसयूव्ही गाडीचे अनावरण स्वप्नाली जागोजी यांच्याहस्ते करण्यात आले.
सांगलीच्या सह्याद्री मोटर्समध्ये 'स्कॉर्पिओ एन'चे अनावरण
सांगली : महिंद्रा अणि महिंद्रा कंपनीच्यावतीने ग्राहकांसाठी नव्या स्वरूपातील 'स्कॉर्पिओ एन' सादर केली. या नव्या स्कॉर्पिओचे अनावरण सह्याद्री मोटर्स प्रा. लि. सांगली येथे अभिनेत्री स्वप्नाली जागोजी, पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
एसयूव्ही सेगमेंटमधील नवीन स्कॉर्पिओ एनमध्ये कंपनीने सर्वोत्तम फिचर्स दिली आहेत. यामध्ये २.०० लिटर पेट्रोल आणि २.२ लिटर डिझेल इंजिन प्रकार दिला आहे, तसेच मॅन्युअल आणि ऑटो या दोन्ही
ट्रान्समिशन सिस्टीम उपलब्ध आहेत. तसेच सिक्स आणि सेव्हन सीटर दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ग्राहकांनी जरूर नवीन स्कॉर्पिओ चालवून पाहावी अणि सणासुदीच्या काळात आपली गाडी मिळेल यासाठी सह्याद्री मोटर्स, माधवनगर रोड,वसंतदादा साखर कारखान्यासमोर,सांगली, येथे लवकरात लवकर बुकिंग करावे, असे आवाहन सह्याद्री मोटर्सचे संचालक विशाल पाटील यांनी केले आहे. यावेळी सह्याद्री मोटर्सचे हर्षवर्धन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मुनाफ काझी, सरव्यवस्थापक विजय पोतदार, विक्री व्यवस्थापक सतीश पाटील, अमर कदम उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली