कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात, चांदोली धरण निम्मे भरले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात, चांदोली धरण निम्मे भरले



SANGLI
12/7/2022
सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात, चांदोली धरण निम्मे भरले....

संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सायंकाळी 18.5 फुटापर्यंत गेलेली दिसून आली.


दरम्यान सांगलीतील नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती..


 अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.
सांगली कृष्णा नदीचे पात्र


दुसरीकडे कृष्णा, वारणा नदीची वाढत असलेली पाणी पातळी लक्षात घेता अलमट्टी धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असून सध्या 75 हजार  क्यूसेक्सने अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चांदोली धरण परिसरात मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे  धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.  

सहा दिवसांतील पावसाने धरण 50 टक्के भरले आहे. यंदा पाच जुलैपासून पावसाला सुरुवात झाली आणि त्यावेळेपासून चांदोली धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी होत आहे. मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्यात आठवड्याभरात तब्बल सात टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

 हवामानखात्याचा दिनांक 12 जुलैचा महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट..





SATARA

निसर्गाने रौद्ररूप धारण केलं असलं तरी... या निसर्गाचा आनंद पर्यटक लुटत आहेत ..

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील लिंगमळा ओसंडला...

            पर्यटक लुटत आहेत निसर्गाचा आनंद....


स्पर्श नवा.. हर्ष नवा....' असे गुणगुणतच निसर्गप्रेमी या निसर्गदृश्याचा आनंद घेत आहेत. वर्षा पर्यटनाचे एक हक्काचे व सुरक्षित ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. सध्या महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडला असून तो पर्यटकांना खुणावत आहे. उंचावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना जणू सादच घालत आहे. मुसळधार पावसाने लिंगमळा धबधब्याचे नयनरम्य व विलोभनिय रूप पहावयास मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा धबधबा हा बेस्ट ऑप्शन म्हणावा लागेल. दरम्यान लिंगमळा धबधब्याचे कोसळणारे रौद्ररूप पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे..

धुंद वातावरणाची अनुभूतीच वेगळी....

दाट धुके तसेच नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या ठिकाणाकडे वळत आहेत. कुणी आपल्या साथीदारांसोबत सेल्फी घेत आहेत तर कुणी पावसात चिंब भिजत आहेत. येथे भेट देणारे अनेक पर्यटक या निसर्गरम्य, धुंद वातावरणाची अनुभूती घेताना दिसत आहेत. लिंगमळा धबधब्याशेजारीही अनेक छोटे छोटे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली