SANGLI...
मिरजेत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 53 वा स्मृतिदिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख व बळीराजा पार्टीचे बाळासाहेब गस्ते यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला
यावेळी जैलाब शेख म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दिन, दलित व दुबळ्यावर होणारे अन्याय अत्याचार यांच्यासह सर्व समस्या आपल्या शाहिरीतून मांडून लोकांना जागृत करण्याचे महानकार्य अण्णाभाऊ साठेयांनी केलेले आहे तसेच आजच्या घडीला अण्णाभाऊचे विचार तरुणांमध्ये व प्रत्येक घरामध्ये त्यांचे कार्य पोहोचवणे गरजेचे आहे असे जैलाब शेख म्हणाले, अशा महान विभूतींना त्रिवार अभिवादन करून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले
यावेळी शिवसेनेचे गुंठेवारी समितीचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, अण्णाभाऊ पुतळा समितीचे मिरज शहर अध्यक्ष भीमराव बेंगलोरे,मनोहर रास्ते,राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे मिरज शहर अध्यक्ष वाजिद खतीब,पंकज मोरे आदी सह बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली