महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची स्थिती...
उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली पण ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित अन तेही एकनाथ शिंदेंशी सहमत? नेमकं काय चाललंय .....
राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. सध्या फक्त त्यांच्याच नावाभोवती राजकारण फिरत आहे.
कारण ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्याकडे नगरविकास मंत्रीपद देखील आहे. परंतु आता त्यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत ३० ते ३५ आमदार आहे असेही समजत आहेत.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आज दुपारी १२ वाजता सर्व आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
पण या बैठकीला शिवसेनेच्या ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित होते. त्यातही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्याच भूमिकेशी सहमती दर्शविल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला होता. भाजपसोबत सरकार स्थापना, फडणवीस मुख्यमंत्री आणि स्वत: उपमुख्यमंत्री असा तो प्रस्ताव होता.
-देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत
-मी (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री व्हावेत
-शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं
-आम्ही सर्व आमदार शिवसेनेतच राहणार
वर्षा’वर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेशी एकमत दाखवले. भाजपासोबत चला नाहीतर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट ‘अल्टिमेटम’ वर्षावर उपस्थित असलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याचं सूत्राच्या हवाल्याने म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी पक्षात राहिल्यामुळे आपली गळचेपी होत असल्याचा आरोप
राष्ट्रवादीसोबत राहणं कठीण असून आमच्या मतदार संघांमध्ये आमची गळचेपी केली जात आहे. त्यांच्यासोबत निवडणूक लढणं वगैरे अशक्य आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला खाऊन टाकेल, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत मांडली आहे. मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना समजून घेण्याचंही आवाहन यावेळी उपस्थित आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून दूर केल्याची बातमी येत आहे..
LOKSANDESH NEWS MEDIA PVT.LTD. MUMBAI