महाराष्ट्रातील राजकीय स्थिती सुधारण्यासाठी सांगलीच्या शिवसैनिकांचे प्रतापगडावर दंडवत.
सांगली /प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी सांगलीच्या शिवसैनिकांनी थेट प्रतापगड गाठत गडाच्या पायथ्यापासून भर पावसात आई भवानी देवीच्या मंदिरा पर्यत दंडवत घातले.
देवीने चमत्कार करुन ही स्थिती सुधारावी अशी प्रार्थना सांगलीच्या शिवसैनिकांनी यावेळी केली.
शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयुर घोडके याबाबत बोलताना म्हणाले की, अफजल खानाच्या स्वारीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संकट उभे राहिले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आई भवानी देवीची प्रार्थना केली आणि मावळ्यांसमोर भवानी देवीची तलवार मिळवून मावळ्यांची लढण्याची शक्ती वाढवली.
त्याच प्रमाणे
यातून शिवसेनेला बळ मिळेल महाराष्ट्राची राजकीय स्थिती सुधारावी अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सांगलीतून शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके उपशहर प्रमुख राम काळे विभाग प्रमुख दिनेश शेलार विभाग प्रमुख अमोल कांबळे शाखा प्रमुख अभिजित कळसेकर उपशाखाप्रमुख रोहन रणपिसे इत्यादिक शिवसैनिक भरपावसात दंडवत घालत आई भवानी कडे साकडे घातले..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली