सांगली;
लेंगरे तालुका खानापूर येथे एकावर तलवार हल्ला झाला आहे,
याबाबत विटा पोलिसांनी माहिती दिली की फिर्यादी सचिन पांडुरंग खिलारे वय 29 व्यवसाय मजुरी राहणार लेंगरे तालुका खानापूर यांच्यावर आरोपी नवनाथ तुकाराम खिलारे यांनी तलवार हल्ला केला आहे,
फिर्यादी सचिन खिलारे व त्यांची आई व पत्नी घरासमोर बोलत बसले असता आरोपी नवनाथ खिलारे हा तेथे येऊन फिर्यादीस तू माझ्याकडे बांधकामाच्या कामाला येत नाही मला न विचारता स्वतः कामे घेतो असे म्हणून फिर्यादीस वाद घालू लागला, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडील जमाव बंदीचा आदेश असताना सुद्धा हातात तलवारीने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून जखमी केले आहे, हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची आई शोभा किंमती आली असता तिलाही धक्काबुक्की करून खाली पाडले व मारहाण केली,
विटा पोलिसांनी कलम 324 323 504 506 व भारतीय शस्त्र अधिनियम 4, 25 नुसार नवनाथ तुकाराम खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप संकपाळ हे करीत आहेत.