महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाचे विमान मातोश्री वरून तरी उड्डाण केलं नसेल ना ..अशी जाणकारांची शंका ?
गेली चार दिवस सत्तेचा सारीपाठ चालू असताना शिवसेनेचे प्रमुख नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले.... या बंडातून त्यांनी आपल्या सहयोगी आमदारांना गुजरात मधील सुरत येथे एका हॉटेलमध्ये एकत्रित आणले... संपूर्ण महाराष्ट्र या कृतीमुळे बंडखोर नेत्याकडे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष देऊन आहे..
हे सर्व सहयोगी घेऊन मंत्री एकनाथ शिंदे सुरत वरून गुवाहाटी मध्ये दाखल झाले... हे सर्व ठीक आहे ....परंतु आता जाणकारांनी असे मत व्यक्त केले आहे की,याची स्क्रिप्ट...
मातोश्री वरून तरी लिहिले गेली नसावी ??
कारण सरळ आहे... शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा पक्ष ...बाळासाहेबांचा कट्टर हिंदुत्वच्या विचारांची कृती ...हे महाविकास आघाडी मध्ये आल्यानंतर गुळमुळीत होऊन गेली होती... शिवसेनेचा मूळ गाभा कट्टर हिंदुत्वाचा असल्यामुळे शिवसेनेतील मंत्र्यांची व शिवसेना कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती..
त्यांना बंधन आल्याचे जाणवत होते... काहीनी उघड हे सांगितले की... शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्याबरोबर युती न करता बाहेर पडावे गेली ...अडीच वर्षे झाले... पक्षांमध्ये या बाबतीत धुसमुस सुरू होती..
राष्ट्रवादी हा पक्का व राजकारणी पक्ष आहे... अकल्पित सत्ता मिळाल्यानंतर राष्ट्रवादीने आपल रूप दाखवण्यात सुरू केले...
प्रथमता राष्ट्रवादीकडे जी खाती होती ती महत्वाची असल्यामुळे त्याच्यातून काँग्रेस व शिवसेना यांना पद्धतशीरपणे डावलण्यात आल्याचे या मंत्र्यांची व कार्यकर्त्यांचे मत आहे ,त्यांना दुय्यम स्वरूपाची वागणूक देऊन राष्ट्रवादीने या सत्तेच्या जोरावर आपला पक्ष वाढवण्यासाठी कधी काँग्रेस मधून, कधी शिवसेने मधून कार्यकर्त्यांना फोडून त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटाच लावला होता,त्यामुळे सहयोगी म्हणवणाऱ्या या पक्षाची ही कृती ही या दोन्ही पक्षांना म्हणजेच शिवसेना व काँग्रेसला मारक ठरत असल्याची भावना या दोन्ही पक्षात निर्माण झालेले होती...
त्यामुळे पडद्यामागून या बंडाची स्क्रिप्ट मातोश्री वरूनच दिली गेली असावी असे मत काही जाणकारांच्या मते होत आहे
त्याचं कारण अस आहे की, आता शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचे सत्ता भोगलेली आहे त्यामुळ "मुख्यमंत्री मीच होणार' हा विषय आता शिवसेनेच्या व मुख्यमंत्री यांच्या हिशोबाने संपलेला आहे... शिवसेना वाढवायची झाली त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली पकड भक्कम करण्याचे झाल्यास, त्याना राजकारणात टिकायचं झाल तर, शिवसेनेच्या मुळ मुद्द्यापासून बाजूला जाऊन चालणार नाही.. आणि यासाठीच आता ह्या स्क्रिप्ट मधून मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही कृती करण्यात आलेली असल्याचे समजते..
यामध्ये पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करणे गरजेचे आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील अजित पवारांनी आपले समर्थकआमदार घेऊन सकाळ सकाळीच पहाटे शपथविधी उरकला .. आणि ही सर्व स्क्रिप्ट कोणी लिहिली होती.. सर्व जनतेस उलगडा झाला.. त्याच प्रमाणे ही आत्ताची स्क्रिप्ट असल्यामुळे यात काय वावगे नसावे....
यामध्ये शिवसेनाप्रमुखांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.. त्याचे असे आहे की, या सत्तेमधून बाहेर पडून परत भाजपाला पाठिंबा देणे हे मुख्यमंत्र्यांना किंवा जनतेला आता पटणारे नाही ...त्यामुळे शिवसेनेचे काही खास पदाधिकाऱ्यांनी हे बंड करून परत भाजपास पाठिंबा देऊन आपल्या विचारांशी मिळते जुळत्या सरकारमध्ये आपण सामील होऊन परत एकदा शिवसेनेस महाराष्ट्र मध्ये काम करण्याची संधी मिळेल असा कयास धरून ही कृती केली असल्याचे मत सर्वसामान्यांचे झालेले आहे ...
जे कट्टर शिवसैनिक आहेत मग आमदार असतील, खासदार असतील, कार्यकर्ते असतील ,पक्ष नेते असतील ते कधीही अशी शिवसेना सोडून जाणार नाहीत...गेले तरी दहा-पंधरा आमदार गेले असते... परंतु चाळीस चाळीस आमदार त्यांच्या पाठीशी राहतात याचा अर्थ काय ? म्हणजे हे सर्व जाणून बुजून केल्यासारखे दिसत आहे आणि ते खरे ही असेल ...विषयच असा आहे की, काँग्रेस तर नंबर 3 मध्येच होती,परंतु राष्ट्रवादी नंबर 2 मध्ये असताना सुद्धा या सर्वांना वरचढ ठरत असल्याने असे घडल्याचे समजते ..
परंतु राजकारणात काहीही घडू शकते असं म्हणतात... राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र कोण कोणाचा शत्रू नसतो
...त्यामुळेच आता फक्त महाराष्ट्राच्या जनते पुढे काय घडणार आहे हे पाहणे गरजेचे आहे....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई