लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज.
कोल्हापूर;हातकलंगले येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे असणारे एन एम एम एस परीक्षा आज संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा हातकणंगले येथे संपन्न झाली, सदर परीक्षेसाठी हातकणंगले तालुक्यातील 22 शाळांमधून जवळजवळ 444 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गेल्या दोन वर्षापासून कोरोणा मुळे खंडित झालेल्या एन एम एम एस परीक्षा यावर्षी संपन्न झाल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
परिणामी आज आपापल्या विद्यार्थ्यांना घेऊन सदर परीक्षा स्थळी पालकांनी मोठी गर्दी केली होती सदर परीक्षा स्थळावर शिक्षण विभाग व आश्रम शाळा यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळी साडेदहा वाजता परीक्षेला सुरुवात झाली व दुपारी तीन वाजता परीक्षेची सांगता झाली सदर परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये परीक्षा झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण दिसून आले. परिणामी सदर परीक्षेमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते व पुढील शिक्षणासाठी मोठे सहकार्य होते अशा आशयाचे मत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी बोलताना व्यक्त केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,कोल्हापूर