कुंभोज ग्रामसचिवालय व बायपास रस्त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू दिला जाणार नाही- आमदार राजू बाबा आवळे
KOLHAPUR
लोकसंदेश वार्ताहर : विनोद शिंगे
कुंभोज ग्रामसचिवालयांच्या बांधकामासाठी कोणत्याही पद्धतीचा निधी कमी पडू दिला जाणार नाही त्याच पद्धतीने बायपास रस्त्याच्या मुरमिकरण डांबरीकरणासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून लवकर फंड उपलब्ध करून देऊ असे आश्वासन हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू बाबा आवळे यांनी दिले
ते महात्मा फुले सूतगिरणी पेठ वडगाव येथे कुंभोज महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंभोज ग्रामपंचायत सरपंच अरुणादेवी पाटील होत्या. यावेळी आमदार आवळे यांना महाविकास आघाडीच्या वतीने कुंभोज मधील विविध समस्यां व त्यासाठी लागणाऱ्या निधीची माहिती महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी माजी सरपंच प्रकाश पाटील किरण नामे यांच्यावतीने देण्यात आली. यावेळी बौद्ध समाज मंदिर, चर्च ची कामे पूर्णत्वास आली असून त्यासाठी अपुन असणारा निधी लवकरात लवकर दिला जाईल, कुंभोज ग्रामस्थांचा आवश्यक असणारा ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या निधीसाठी निधी मंजूर झाला असून त्याची लवकरच पूर्तता केली जाईल असेही आमदार आवळे यांनी सांगितले .
यावेळी आमदार राजू बाबा आवळे यांचा सत्कार महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी ,प्रकाश पाटील उपसरपंच अनिकेत चौगुले, सरपंच अरुणादेवी पाटील धनाजी तिवढे ,सदाशिव महापुरे ,दावीत घाटगे ,अशोक आरगे ,डॉक्टर धर्मवीर पाटील, महावीर चौगुले, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी, जयश्री जाधव, सुदर्शन पाटील,आपासाहेब पाटिल,लखन भोसले,आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली