राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचा ५६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा...*
*शिवसेना पक्षाचा ५६ वा वर्धापनदिन साजरा*
रत्नागिरी;राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजनजी साळवी* ह्यांचे सूचनेनुसार *शिवसेना भवन, राजापूर* व *शिवसेना तालुका कार्यालय, लांजा* येथे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. तसेच ओणी वात्सल्य मंदिर येथे खाऊ वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, संजय पवार, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत मंचेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, उप तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, दिलीपभाऊ पळसुले देसाई, राजन कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, कमलाकर कदम, नरेश दुधवडकर, शरद चरकरी, लक्ष्मण मोर्ये, चंद्रकांत शिंदे, मा.सभापती लीलाताई घडशी, मानसी आंबेकर, दीपाली दळवी, प्रियंका रसाळ, शहर महिला आघाडी छाया गांगण, उप विभागप्रमुख चेतन खंदारे, विश्वास मांडवकर, सरपंच संजय पाष्ठे, युवासेना राहुल शिंदे, माजी नगरसेवक विनय गुरव, सौरभ खडपे, गोविंद चव्हाण, स्वाती बोटले, शहर संघटक जितेंद्र मालपेकर, युवासेना युवती प्रतीक्षा मांजरेकर, डोंगर सरपंच विजय आंबरें, कार्यालय प्रमुख मधुकर बाणे, उपविभाग प्रमुख दिलीप चव्हाण, कार्यालयप्रमुख दीपक कटम व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,रत्नागिरी