कुंभोज आरोग्य पथकाच्या वतीने डेंगू बचाव मोहिमेला सुरुवात, अनेक ठिकाणी संशयितांच्या तपासण्या..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कुंभोज आरोग्य पथकाच्या वतीने डेंगू बचाव मोहिमेला सुरुवात, अनेक ठिकाणी संशयितांच्या तपासण्या..

कुंभोज आरोग्य पथकाच्या वतीने डेंगू बचाव मोहिमेला सुरुवात, अनेक ठिकाणी संशयितांच्या तपासण्या..


KOLHAPUR
कुंभोज लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी विनोद शिंदे
कुंभोज तालुका हातकणंगले येथे काही ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रना व ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने संरक्षण व उपाययोजना म्हणून सैशयीत रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली


 तसेच काही ठिकाणी पाणी तपासणी करून काही ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. हातकंणगले तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने कुंभोज परिसरातील डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची चर्चा जोरात आहे परिणामी सदर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची ही माहिती काही ठिकाणी मिळाली असून याबाबत आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.


आरोग्य विभागाने तात्काळ आज कुंभोज परिसराचा सर्वे करून संशयित असणाऱ्या घरांना भेटी देऊन सदर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोग्य खात्याची यंत्रणा राबवून नागरिकांना वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या. कोणत्याही पद्धतीच्या डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्यास प्राथमिक पथक कुंभोज यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन. सावर्डे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिखरे यांनी केले आहे. आज दिवसभर आशा वर्कर, सुपरवायझर व आरोग्य कर्मचारी यांनी कुंभोज परिसरात अनेक ठिकाणी सर्वे करून डेंगू साठी आवश्यक असणाऱ्या सर्व पद्धतीच्या तपासण्या केल्या आहेत.            परिणामी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने वेळोवेळी औषध फवारणी व गटर काढण्याचे काम करणे गरजेचे होते परंतु. सध्या काही वेळा पदाधिकारी बदल व काही वेळा ग्रामसेवक बदल यामुळे गावच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्या गोष्टीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी ग्रामपंचायत कुंभोज यांनी गावात सर्वत्र औषध फवारणी करुन घेण्याची मागणी ही ग्रामस्थातून होत आहे.  

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली