मुलींनी आयुष्यात करिअरला महत्त्व दिले पाहिजे, पण त्याचबरोबर आपली पंरपरा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे, विनोद शिंगे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुलींनी आयुष्यात करिअरला महत्त्व दिले पाहिजे, पण त्याचबरोबर आपली पंरपरा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे, विनोद शिंगे




कोल्हापूर;लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज

विद्यार्थ्यांनी यशा बरोबर नैतिकता आणि सुसंस्कारित होणे गरजचे असल्याचे मत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंगे यांनी व्यक्त केले.

कवठेसार (ताशिरोळ )येथील सुयश क्लासेसच्या वतीने इयत्ता दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार दानोळी व कुंभोज परिसरातील सर्व पत्रकारांच्या हस्ते करण्याचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना श्री शिंगे म्हणाले, मुलींनी आयुष्यात करिअरला महत्त्व दिले पाहिजे पण त्याचबरोबर आपली पंरपरा व सैस्कुतीचे जतन केले पाहिजे, आज स्पर्धेचा युगात भाकरी बनविण्याचे शिक्षण बाहेरील जगात कोठेच विकत मिळत नाही ते त्यांना त्याची आई व आजी यांच्याकडूनच शिकावे लागते,आज मुलीनी कुंटुबात उत्तम सुगरण होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुला मुलीनी शिक्षण घेत आसताना आपल्याआई वडिलांनी घेतलेले कष्ट व कुटुंबाने दिलेली साथ ,गुरुचे मागदशन विसरु नये , तुम्ही विद्यार्थ्यांनीही दहावी बारावीचे वयात तरुण अवस्था प्राप्त होत असल्याने या वयात प्रेम प्रकरण व इतर बीभत्स विचार येतात ,यावेळी जर आपन चुकीच्या प्रलोभनांना बळी पडाल तर करिअर बरबाद होईल, हेच वय आयुष्याला वळण देणारे आणि करिअर घडवण्यासाठी महत्वपूर्ण असते.या वयात आपण स्वतःला करिअरला महत्त्व देत आपल्या आई वडील व गुरु यांचा आयुष्यात नेहमी सन्मान ठेवावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक बसवराज वाले गुरुजी होते. यावेळी हिंगणगाव दानोळी कुंभोज कवठेसार परिसरातील सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होते.
सुयश क्लासेसचे गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी
चि.प्रज्वल वसंत महाजन , कवठेसार,कु.विजेता वैभव पाटील,हिंगणगाव,कु.रजनी रविंद्र देसाई ,हिंगणगाव कु.श्रावणी सुनील संकपाळ,हिंगणगाव,चि. प्रणव प्रकाश उपाध्ये, कवठेसार चि.रणजित सुरेश पाटील,कवठेसार
कु.वैष्णवी अश्विन चौगुले, कवठेसार कु.सानिका सुभाण्णा मेटकर,हिंगणगाव कु.संजाली तेजपाल भोकरे, कवठेसार यांचा सत्कार उपशी पत्रकार व मान्यवर मंडळी यांच्या वतीने करण्यात आला. पत्रकार संघटनेच्या वतीने सुयश क्लासचे शिक्षक सुरेश रोकडे यांचाही सत्कार करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मिडिया प्रा.ली.मुंबई