*डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीमधील सिव्हिल व मेकॅनिकलच्या १० विद्यार्थ्यांची इंडोव्हान्स मध्ये निवड*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

*डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीमधील सिव्हिल व मेकॅनिकलच्या १० विद्यार्थ्यांची इंडोव्हान्स मध्ये निवड*



कोल्हापूर..

डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीमधील सिव्हिल व मेकॅनिकलच्या १० विद्यार्थ्यांची इंडोव्हान्स मध्ये निवड*
 जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनीरिंग शाखेच्या 10 विद्यार्थ्यांची निवड इंडोव्हान्स या कंपनीमध्ये प्लेसमेंटद्वारे झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली.
     इंडोव्हान्स हि आऊट सोर्सेस द्वारे कॅड सुविधा पुरविणारी जगातील नामांकित कंपनी आहे. आर्किटेक्चर पासून इंजिनिअरिंग पर्यंत ग्राहक पसंतीस सेवा पुरविणारी हि कंपनी सध्या भारतामध्ये पुणे या ठिकाणी  कार्यरत आहे.
 निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागाचे 5  तर सीव्हील विभागाचे 5 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये साजिद शेख, समेद चौगुले,दिग्विजय अंबी, मोहिनी जकाते,रोहित बिराजदार मेकॅनिकल विभागातून तर बाएक गिंगलोवी, मृणाली अलोली, सागर गेंड, स्वालिहा बागवान व उर्मिला खोत सिविल विभागातून नोकरीसाठी सिलेक्ट झाले आहेत.         
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.श्री.विजय मगदूम व व्हॉ.चेअरपर्सन अँड.डॉ.सौ. सोनाली मगदुम यांच्या हस्ते करण्यात आला.
जागतिक औद्योगिक क्षेत्रातील मंदीच्या काळानंतर मेकॅनिकल व सिव्हिल विभागाच्या  विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये ही नोकरीची संधी मिळाली आहे. भविष्यात या दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न करून चांगले रिजल्ट दिले तर नोकरीच्या संधी सर्वांना मिळू शकतात आणि कॉलेज व्यवस्थापन, स्टाफ व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर त्यासाठी सदोदित प्रयत्न करतील अशी माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. पी.माळगे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख प्रा. एस. एम. शेख व डॉ.जी.एस.लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.विभागातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.नियाज नदाफ प्रा.संदीप गायकवाड, प्रा. रोहन श्रेष्टी यांचे मोलाचे सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले.