दिवाळीची जशी चंदनाच्या साबणाची ऍड आहे ... तशी "आला आला कोरोना आला" आता पेशंटला लुटायची वेळ झाली" असंच काही म्हणायची वेळ आलेली आहे...
कोन बनेगा करोडपतीच नव पर्व येत आहे....
आणि यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर जी जाहिरात केली जाते त्याच्यामध्ये गोदी मिडिया ,सरकार साठी काम करणाऱ्या सर्व चाटू पत्रकारांना व टीव्ही मीडियाला अभिताभ बच्चन यांनी सोनी टीव्हीच्या माध्यमातून एक चपराक लावलेली आहे..
त्या वेळीं आलेल्या नवीन दोन हजाराच्या नोटा मध्ये अशी काहीतरी जादुई चीप आहे की, ती नोट 120 मीटर सुद्धा खाली जमिनीत दडवून ठेवली तरी त्या नोटे चा पत्ता सरकारला सॅटॅलाइट द्वारा लागणार आहे.. अशी काही तरी अक्कल पाजळत या मोठ्या मोठ्या टीव्ही चॅनल्स वाल्यांनी संपूर्ण भारताला उल्लू बनवले....
त्या WHO नावाच्या जागतिक आरोग्य संघटनेने आपण या जगाला किती उल्लू व मूर्ख बनवू शकतो याचा एक प्रयोग कोवीडच्या माध्यमातून केला..
आणि त्यात ते यशस्वीही झाले ...अर्थात कोविड कधी नव्हताच... परंतु "दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये" अशी मानसिकता बनवली गेली की.. सर्दी पडशाला सुद्धा कोरोना नाव देऊन लाखो रुपये उकळले गेले, शारीरिक अंग विकले गेले, बऱ्याच आर्थिक घडामोडी याच्यातून घडवल्या गेल्या व या जगावर त्याच सावट पद्धतशीरपणे मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आल... हे एक प्रकारचे युद्ध होतं... परंतू हे कळायला आम्ही अजून शंभर वर्षे मागे आहोत...
त्यामध्ये एक विशिष्ट समाजाला सुद्धा गुरफटले गेले... नंतर कोर्टाने सांगितले.. की याच्या मध्ये या समाजाचा काहीं संबंध नाही..
आता पहा...
हा महिना जूनचा आहे... पावसात फिरणार आहे .... आपण पावसात भिजणारच आहोत.. सर्दी-पडसे तर होणारच आहे....परत कोरोनाच्या नावाने पद्धतशीर डोके वर काढले जाईल .... कोरोनाचा तिसरा टप्पा येत आहे याची वल्गना आजपासूनच करायची आणि जनतेत मानसिक भ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर डाव आता सुरू होईल...परत काहीं डॉक्टर संबंधित लोकांनी आपल्या आपल्या सु-या व तलवारी पाजळून ठेवलेल्या आहेतच... एक पेशंट आला की , एक तीळ वाटून खाल्ल्यासारखे सात जण वाटून घेणे, खाण्याची पद्धती आहे, ती आता परत सुरु होईल... यात गव्हर्मेंटचे वरिष्ठ अधिकारी , सर्व यंत्रणा देखील सामील आहेत, परंतु ..आता जनता देखील शहाणी झालेली आहे ,तो खोकला सर्दी पडसे झाले तर आता तो त्याची तपासणी करूनच घेत नाही ,साध्या उपायाने सुद्धा तो बरा होत आहे... असे गेले वर्षभरात पाहिल्यानंतर कळून येत आहे... तर अशा या मानसिक रोगाला आपण कितपत साथ द्यायची... याच काहीतरी गणित आहे... परंतु तुमच्यावर आता बुद्धिजीवी डॉक्टर्स, मोठे मोठे अधिकारी, मोठे मोठे तज्ञ, लोक या टीव्ही डिबेटवर , मोठ्या मुख्य पेपर्समध्ये मोठे मोठे रखाण्यातून आपली अक्कल, ज्ञान पाजळतील...
(आता तिसरी लाट कशी येणार याच्याबद्दल सप्रमाण पुरावे देतील.... कोरानाने यांच्या कानात घेऊन सांगितलेल आहे की.. आता मी येणार आहे म्हणून .) ..कोरोना कसा आहे... कसा पसरतो... कुठे हात लावा ...कुठे हात लावू नका... मास्क वापरा वगैरे वगैरे. त्याच्या बाबतीत पद्धतशीर प्रवचन करतील. ..या टीव्ही चॅनल्स व मोठ्या मोठ्या पेपर्स वाल्यांना ...याच्या बदल्यात मोठ्या मोठ्या जाहिराती आणि त्याचे पैसे मिळत असतात..
. हे सर्वसाधारण जनतेला फार कमी माहिती पडते ..म्हणून दिवाळीची जशी चंदनाच्या साबणाची ऍड आहे ... तशी "आला आला कोरोना आला" आता पेशंटला लुटायची वेळ झाली" असंच काही म्हणायची वेळ आलेली आहे...
तर जनतेने त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपापल्या कामास लागावे... हे एक षड्यंत्र आहे असं समजून आपल्या आपल्या कामास लागावे ..मनात कोरोना विषयी विचार सुद्धा आणू नये......
सलीम नदाफ, सहसंपादक,लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ,