.कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीसाठा जून महिन्यामध्ये दहा टक्केच ठेवावा________राज्य प्रवक्ता संतोष पाटील.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा जून महिन्यांमध्ये 10 टक्केच ठेवावा यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदित्य मोहिते यांना राज्य प्रवक्ता संतोष पाटील यांनी दिले पत्र व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी केली चर्चा. सांगली शहरांमध्ये अलमट्टी धरणामध्ये. पाणीसाठा केल्यामुळे व त्या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळेच आत्तापर्यंत तीन वेळा अर्धी सांगली जलमय झाली होती. कारण सांगली, सातारा, व कोल्हापूर व कर्नाटकातील काही नद्या मुळे व विशेष करून कोयना पाणलोट क्षेत्रांमध्ये ज्यादा पाऊस झाल्यामुळे व सगळीकडून पाण्याचा लोट प्रमाणापेक्षा जास्त आल्यामुळे हे सर्व पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरण मध्ये जाते व त्या ठिकाणी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग केला तर त्याचा फुगवटा निर्माण हा सांगली पर्यंत होतो त्यामुळे सांगली शहरात पाणी घुसून शहर जलमय होते ही सांगलीकरांना तीन वेळा याचा अनुभव आला आहे. कर्नाटकातील जलसंपदाच्या काहीअधिकाऱ्यांच्या चुकांमुळे सांगली जिल्हा ,.कोल्हापूर जिल्हा त शेती, शेतांची ,घरांची , दुकानाचे, गोडावन व अनेक व्यवसायाची वित्तहानी व जीवित हनी होण्याची शक्यताअसते व झाली आहे म्हणूनच आम्ही पाटबंधारे अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की कर्नाटकातील अलमट्टी धरणा मधील जून महिन्यामध्ये पाण्याचा साठा हा 10 टक्के च ठेवावा ,परंतु त्या ठिकाणी सध्या 35 टक्के पाणी साठा आहे याची आम्ही पाहणी केली असता ते आमच्या निदर्शनास आले. भविष्य काळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे परत एकदा सांगली जलमय होण्याची दाट शक्यता आहे, हे होऊ नये म्हणून कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे यांना आम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटलो व त्यांना आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगून व प्रसंगी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील साहेब व सहकार व कृषी राज्यमंत्री नामदार डॉक्टर विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब यांना भेटून निवेदन देणार आहोत. तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जत विधानसभा चे आमदार माननीय विक्रम दादा सावंत यांना विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्यात यावा असे निवेदन त्यांनाही देण्यात येणार आहे. यावेळेला सुशांत कदम, अनमोल पाटील , सागर बडोदेकर, स्वप्निल शेटे, चैतन्य माने, गणेश सोनकर ,निखिल सकटे, अविनाश जाधव उपस्थित होते.