KOLHAPUR
इचलकरंजी लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे
स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ*, कोल्हापूर, रायबाग, होसुर, *बेळगाव चे उत्तराधिकारी पदी प.पू. क्षुल्लक श्री भरतसेन महाराज* विराजमान झाले. यांचा पट्टाभिषेक महोत्सव सुवर्णभूमी, मुस्कान लाॅन, कोल्हापूर याठिकाणी संपन्न झाला.
या महोत्सवास कोल्हापूरचे शाहू महाराज, सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून त्यांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, जवाहर साखर कारखाना माजी चेअरमन उत्तम आवाडे,मा आ संजय पाटील बेळगाव, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, वैशाली आवाडे यांच्यासह श्रावक आणि श्राविका उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली