कोल्हापूर लोकसंदेश वार्ताहर ;विनोद शिंगे
गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. परंतु शिवसेना एक अंगार आहे व शिवसेनाप्रमुखांच्या मुशीत तयार झालेले तमाम शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी धगधगत्या निखाऱ्याप्रमाणे उभे आहेत. शिवसेनेने आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक वादळं पाहिली आहेत व ती ठाकरी बाण्याने समर्थपणे थोपवली आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती शिवसेनेसाठी नवीन नाही. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सामर्थ्यशाली नेतृत्त्वाखाली यातूनही शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही तमाम शिवसैनिक हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी भावना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील मलाबादे चौकात उपस्थित शिवसैनिकांशी ते बोलत होते.*
यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समर्थनार्थ मलाबादे चौक परिसर 'जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद', 'उद्धवसाहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणांनी दणाणून सोडला.*
उध्दवसाहेब, देतील तो आदेश व घेतील तो निर्णय आम्हां शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य असेल.
यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड,मधुकर पाटील,साताप्पा भवान,तालुकाप्रमुख वैभव उगळे,बाजीराव पाटील,शहरप्रमुख सयाजी चव्हाण,महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ.मंगल चव्हाण,आण्णासो बिलोरे,संदिप पाटील,बाबासाहेब सावगावे,अमोल देशपांडे,संजय माने,युवराज घोरपडे,संजय अनुसे,अरुण माळी,सरदार सुर्यवंशी,प्रमोद सूर्यवंशी,राजू मुदाळकर,शामराव पाटील यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई