भविष्यामध्ये गोकुळ दूध संघ अमूलच्या बरोबरीने काम करेल...*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भविष्यामध्ये गोकुळ दूध संघ अमूलच्या बरोबरीने काम करेल...*



*गडहिंग्लज तालुका म्हैस दूध वाढ उत्पादक मेळाव्यामध्ये गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांचे प्रतिपादन...*

*दूध उत्पादक, सभासदांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या मार्फत दूध वाढीसाठी तालुका तालुकानिहाय मेळावे आज गडहिंग्लज मधून सुरुवात करण्यात आली.*

*गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेबांनी मेळाव्यास संबोधित करताना, दूध संघाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधांची माहिती, दूध वाढीसाठी आण्णासाहेब पाटील महामंडळतुन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाची माहिती आणि सभासदांच्या अडीअडचणीचे निरीक्षण करण्यासाठी या मेळावाचे मुळ नियोजनाचे स्वरूप आपले आहे, असे सांगितले.*

*पुढे नविद मुश्रीफ साहेब म्हणाले, दूध उत्पादकांच्या हाताच्या, कष्टांच्या व घामाला दूध दरवाढीच्या माध्यमातून योग्य न्याय देण्यासाठी गोकुळ दूध संघ दूध उत्पादक, सभासदांच्या पाठीमागे हिमालयासारखे उभे राहील. भविष्यामध्ये गोकुळ दूध संघ अमूलच्या बरोबरीने काम करेल. असा त्यांनी आशावाद व्यक्त केला.*

*यावेळी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी), ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, सर्व संचालक मंडळ, सचिव, दूध उत्पादक व सभासद उपस्थित होते.*