SANGLI
इस्लामपुरात शिवसैनिक पक्षाबरोबरच!
जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एकसंघ राहण्याचा सांगलीत निर्धार
सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एकसंधपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार शुक्रवारी सायंकाळी सांगलीत आयोजित केलेल्या बैठकीत केला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख महेंद्रसिगं चंडाळे, मयूर घोडके, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता ताई इंगळे यांच्यासह मान्यवरांनी आपण उद्धवजी यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते हे मुंबई येथे उद्धवजीनी आयोजित केलेल्या पक्षाच्या बैठकीस उपस्थित होते. शनिवारी सुद्धा ते शिवसेना भवनातच असतील आणि पक्षाची पुढची वाटचाल काय असेल त्याबाबत ते आल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन सांगणार आहेत असे शंभूराज काटकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी महाराष्ट्रात परत येऊन उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. आपल्या भूमिकेला मुरड घालावी असा ठराव करण्यात आला.
ग्रामीण जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी एकनाथ भाईबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याचे नुकतेच समजले. वाळवा शिराळा तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पक्षाचे विविध पदावर काम करणारे पदाधिकारी, नगरसेवक त्यांच्याबरोबर राहतील असे नाही. ते उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि ते सांगतील त्या पद्धतीनेच काम करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील सच्चे, निष्ठावान शिवसैनिक उद्धवजी बरोबरच आहेत. आम्ही पुन्हा नव्या जोमाने जिल्ह्यात शिवसेना उभी करू. आप्पासाहेब काटकर यांनी या जिल्ह्यात शिवसेना रुजवली आहे. त्यांच्या सोबत शेकडो शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी तिची पाळेमुळे गावोगाव खोलवर रुजवली आहेत. तीच शिवसेना आम्ही पुन्हा सक्रीय करू. प्रदीर्घ काळ आनंदराव बापू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेचे कार्य जोमाने केले आहे. आम्ही त्यांच्याबद्दल कोणताही वाईट उद्गार काढणार नाही. त्यांच्या कार्यक्षेत्रात आजच्यापेक्षा चांगल्या स्थितीत वाळवा शिराळा सह सर्व जिल्ह्यात शिवसेना उभी करू असा शब्द मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे यांना दिला आहे. लवकरच इस्लामपुरात येऊन शिवसैनिकांशी बोलून आम्ही पुढची दिशा ठरवू. अनेक झुंझार शिवसैनिक वाळवा शिराळा तालुक्यात पक्ष आदेशाप्रमाणे कार्यरत होण्यास तयार असून त्यांचे संदेश प्राप्त होत आहेत. काहींची दिशाभूल झाली असून ते पक्ष सोडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. या बैठकीसाठी जिल्हा संघटक बजरंग पाटील उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर उपजिल्हा भाऊ महादेव मगदूम शहर प्रमुख महिंद्र चंडाळे शहर प्रमुख मयूर घोडके शहर प्रमुख हरिदास लिंगडे शहर प्रमुख रुपेश बापाची सेवा प्रमुख अमोल पाटील मिरजेचे उपशहर प्रमुख पप्पू शिंदे अतुल रसाळ डॉक्टर किशोर ठाणेकर त्याचबरोबर माजी शहरप्रमुख प्रसाद रीसवडे उपशहर प्रमुख अविनाश कांबळे नितीन काळे विभाग प्रमुख अमोल कांबळे रोहित दुधाळ प्रकाश अहिरे सुरेश साखळकर विठ्ठल संकपाळ युवा सेनेचे संनत पाटील आदी उपस्थित होते त्याचबरोबर उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी एक शपथ घेतली
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली