शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली, नाही तर आम्हाला विरोधी बाकावर बसावं लागलं असतं,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केला आहे.त्यामुळे महा विकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत असल्याचा मंत्री विश्वजीत कदम यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. सांगलीच्या पलूस येथील आमणापूर येथील जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते.
पलूस तालुक्यातील आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला.या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना, महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली यावर भाष्य केले.मंत्री कदम म्हणाले, विधानसभा निवडणुकावेळी प्रचारासाठी फिरत होतो,त्यावेळी आपण लोकांना कानात सांगत होतो,मला निवडून दिले की,कदाचित मला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागेल,सत्ता काय आमची येत नाही.पण निवडणूक झाली.आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले,ते बरं झालं.त्यामुळे राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आलं,असा गुपित मंत्री कदम यांनी सांगितले.
बाईट - विश्वजित कदम - कृषी राज्यमंत्री.