कोल्हापूर
घोडावत विद्यापीठामध्ये ''अनेका क्लाऊड लॅब'' चे उदघाटन
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाच्या सहयोगाने सुरु केली लॅब
कोल्हापूर ;लोकसंदेश वार्ताहर ;विनोद शिंगे
कोल्हापूर,
संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामार्फत आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाच्या मंजरासॉफ्ट या स्पिन-ऑफ कंपनीच्या सहकार्याने संजय घोडावत विद्यापीठात ''अनेका क्लाऊड लॅब'' सुरु करण्यात आली. या लॅब चे उदघाटन विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव, प्रा.दीपिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी युनिव्हर्सिटी ऑफ टार्टू, एस्टोनिया च्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे संशोधक श्री शिवानंद पुजारा यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेका क्लाउड लॅब वर प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित केले.
यावेळी कुलगुरू, प्रा.डॉ. अरुण पाटील यांनी एसजीयु आणि एसजीयु बाहेरील विद्यार्थ्यांना या सहयोग उपक्रमाद्वारे सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करणार असल्याचे जाहीर केले. या लॅब मध्ये उपलब्ध असलेली ही अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर भविष्यात अध्यापन व संशोधनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला जाईल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विश्वस्त विनायक भोसले यांनी भविष्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने क्लाउडसह स्टँडअलोन डिग्री स्पेशलायझेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई