शिरोळ :
दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी अपार परिश्रम घेवून निर्माण केलेले सामाजिक, सहकार क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. शिरोळभूषण हा पुरस्कार नव्या पिढी ।ला पुरस्कृत करणारा असून नव्या पिढीला बळ देणारा आहे. दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांनी स्वत:पुरतं आयुष्य न जगता इतरांच्या सुख-दु:खात राहून अलौकिक कार्य केले आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा व शिरोळ विधानसभेची अडचण होऊ न देता दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांना हातकणंगले विधानसभा मतदार संघात नेऊन मी शिरोळचे तिसरं भूषण करणार आहे. यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार राजू शेट्टी यांनी साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री, आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले.

शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौक येथे दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्यावतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी वाढदिवसानिमित्त दलितमित्र डॉ. अशोकराव माने व सौ. रेखा माने यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, शिरोळभूषण प्राप्त बजरंग काळे व डॉ.दिपाली काळे यांनी आपापल्या परीने कर्तृत्व सिध्द केले आहे. शिरोळ जन्मभूमी असणाºया पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी भूषणावह आहे, असे सांगून त्यांनी अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा शिरोळकरांनी जपली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री डॉ. यड्रावकर म्हणाले, शिरोळ गावाची एकी अनेकवेळा पाहिली आहे. शिक्षणाच्या सुविधांमुळे शिरोळकरांचा जयसिंगपूराशी नाते अधिक वाढले. पण ज्या ज्या वेळी अडचणी निर्माण होतील त्यावेळी मतभेद बाजूला ठेवून गाव एकत्र येते, हा इतिहास आहे. दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी समाजाचं काही देणं लागतो, या भूमिकेतून आदर्शवत काम केले असून आमदार विनय कोरे सावकार व माझ्यासारखे मोठे होण्यासाठी अशोकराव माने बापू यांना नक्कीच पाठबळ देवू, अशी ग्वाही दिली.
नगराध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. मानपत्राचे वाचन रेखा गायकवाड व दगडू माने यांनी केले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळभूषण सत्कारमुर्ती बजरंग काळे गुरुजी, पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास दत्तचे संचालक अनिलराव यादव, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, स्वाभिमानीचे नेते संदीप कारंडे, वारणा दूध संघाचे संचालक अरूण पाटील, वारणा कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी उपसरपंच बाबा पाटील, दत्तचे संचालक शेखर पाटील, सुभाषसिंग रजपूत, माजी सरपंच दरगू गावडे, उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, नगरसेवक डॉ.अरविंद माने, स्वामी समर्थ सुतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने, चंद्रकांत कांबळे, प्रल्हद कांबळे, अनिकेत कांबळे, राजेश शर्मा, रविंद्र जाधव, धनंजय टारे, राकेश खोंद्रे, बी. जी. माने,शिवाजीराव माने-देशमुख, गजानन संकपाळ, पंडीतराव काळे, धनाजी पाटील-नरदेकर, विजय देशमुख, विजय आरगे, निळकंठ फल्ले, सागर कोळी, बबन बन्ने, एम.एस.गवंडी, संतोष माने, ओंकार माने, सतिश राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खातेदार यांनी आभार मानले. दरम्यान, युवा किर्तनकार ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, पुणे यांचे किर्तन झाले. या कार्यक्रमास उपस्थितामधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.