*वंचित घटकांनी निराधार योजनेचा लाभ घ्यावा- ज्योती आदाटे*
येथील रेड स्वस्तिक सोसायटी सांगली शाखेच्या वतीने समाजातील वंचित घटकांना पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे यांनी उपस्थितांना या योजने अंतर्गत येणारे घटक, कागदपत्रांची पूर्तता, प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. अशा शिबिरांमुळे या योजनेबद्दल जनजागृती होण्यास मदत होते असे म्हणाल्या.
संस्थेचे सचिव विजय खेत्रे म्हणाले की, समाजातील असे अनेक घटक या योजनेपासून वंचित होते ज्योती आदाटे जेंव्हा पासुन या समितीवर अध्यक्षा झालेत तेव्हापासून वंचित घटकातील लोकांचें लाभ घेण्याचे प्रमाण वाढले आहे कारण त्या समिती स्थापन झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात मेळावे प्रशिक्षण शिबीरे अगदी समर्पित भावनेने घेत आहेत आजच्या या शिबिरामुळेच कळले की कितीतरी घटक या योजनेत येतात आम्ही या योजणेबाबत संभ्रमित होतो पण ज्योती ताई मुळे सखोल माहिती मिळाली या योजनांबाबत जनसामान्यांच्यात जागृती निर्माण झाली आहे.आज या ठिकाणी मी अध्यक्षाना ग्वाही देतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त वंचित घटकातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार
शिबिरासाठी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका तुपलोंढे, सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे, उदय बेलवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. ओंकार चिखले यांनी सर्वांचे स्वागत केले. शाखाध्यक्ष विशाल लोहार यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, गरजू लाभार्थी बहुसंख्यने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई