बाप ,,,,,,,,, बाप हा बाप असतो.... आपल्या मुलांचे करिअर घडवणाऱ्या जागतिक "बाप दिवसाच्या'' हार्दिक शुभेच्छा....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बाप ,,,,,,,,, बाप हा बाप असतो.... आपल्या मुलांचे करिअर घडवणाऱ्या जागतिक "बाप दिवसाच्या'' हार्दिक शुभेच्छा....




बाप ,,,,,,,,, बाप हा बाप असतो .
आज १९ जून जागतिक वडील दिन त्या निमित्ताने वडिलांबद्दल काही ४ गोष्ठी मांडत आहे फादर डे च्या अनुषंगानेच इथे मांडत आहे .

बाबा , पप्पा ड्याडी , बोलायला , ऐकायला किती छान वाटतंय नै ! पण आपण कधी कधी मुद्दामहून , जाणून बुजून त्यांना बाप या नावानेच संबोधतो (माघारी) . आज अश्याच एका बापाची कहाणी , आई घराचे मांगल्ये असते तर वडील घराचे अस्तित्व असतात , पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे , त्यांच्या विषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे ,,,,,,,,,,नाही .



" लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते हि तापट, व्यसनी , चिडखोर , भांडखोर , मारझोड करणारे ,, नाही असे वडील असतील हि १ ते २ % पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आई कडे अश्रुंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते , पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते , आणि रडणाऱ्या पेक्ष्या सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा समईच जास्त तापत असते , आणि श्रेय !! श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते . रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते , पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो . आई सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुस्मुस्तात ते आपले वडिलच असतात , स्वताचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडाना धीर देणे , कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात , पत्नीने अर्धावासात सोडले तरी स्वताला अवर घालत मुलांच्या अश्रुना आवर घालणारे वडिलच असतात.



" जिजाऊ नि शिवबाना घडवले असे अवश्य म्हणता येईल , पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी" , " देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण त्याच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा " ," राम हा कौसल्या पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मारणारा बाप राजा दशरथच होता ".

वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियन पहिले कि, कळते कि नशिबाची भोक त्यांच्या बनियन ला पडली आहेत , त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो , मुलांना कपडे घेतील , बायकोला साडी घेतील , पण स्वत मात्र जुनेच कपडे वापरतील . मुलगा सलून मध्ये ५० एक रुपये खर्चतो , मुलगी पार्लर मध्ये १०० एक रुपये खर्चेल , पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील , कधी कधी तो हि नसेल तर पाणी लाऊन दाढी खरवडतिल . बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टर कडे जात नाहीत , मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच , त्यांना काळजी असते ती , डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची , कारण मुलीचे लग्न , मुलांचे शिक्षण , घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात उत्पनाचे साधन हि फक्त तेच असतात .


ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल , इंजिनीरिंग , या सारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात , महिन्याचा पगार झाला कि सर्व खर्चात बचत करून , काटकसर करून पहिला मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात , खरे तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैस्यातून शिक्षण कमी आणि मौज मजाच जास्त करतात , मित्रांना पार्ट्या देणे , सिनेमे पाहणे, या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणार्या वडिलांचीच टिंगल टवाळी करत असतात , हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणे , त्यांच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात
" ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही ,कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो , तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो . आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो .

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि जवळी वाटते ती आई , कारण ती जवळ घेते , कौतुक करते, प्रेम करते , गोंजारते , पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा , अभिमानाने सर्वाना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही .

चटका बसला , ठेच लागली , फटका बसला तरं तोंडातून आपसूकच आई हाच शब्द बाहेर पडतो , पण एकादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एकाद्या ट्रक ने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तरं त्यावेळी आपण बाप रे ........! असेच म्हणतो , छोटी छोटी संकटे आई सोसती हो , पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच.......... आठवतो... काय पटतंय काय ??????

काद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते , पण जर एकादा मयत झाला तरं बापालाच जावे लागते . मुलाच्या नोकरी साठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप , मुलीच्या स्थळासाठी उम्भरे झिजवणारा बाप , घरच्यासाठी स्वताच्या व्यथा दडपणारा बाप , खरच किती ग्रेट असतो बाप .

वडिलांचे खरे महत्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणीच जातात आणि घराच्या सर्व जबाबदार्या पेलाव्या लागतात , एकेक गोष्टीसाठी त्यांना तरसाव लागत तेच वडिलांचे महत्व समजतात .

वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी , सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असताना हि फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदलेला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल , त्यांची विचारपूस करेल .



सर्व धर्मांमध्ये व ग्रंथांमध्ये देखील आई-वडिलांच्या विषयी आदर व्यक्त केलेला आहे.. तो वाखाणण्याजोगा आहे... इस्लाम धर्मामध्ये तरी "मां के पैरो तले जन्नत है ' और "बाप जन्नत का दरवाजा हैं '' असं म्हंटलं गेल आहे.. म्हणजे आई-वडिलांना जो मान देतो, त्यांची सेवा करतो त्याला पृथ्वीतलावर जिवंतपणी सुख-समृद्धी व शांतता लाभते व मृत्युनंतर देखील तो स्वर्ग प्राप्ती करू शकतो... असा त्याचा आशय आहे.. मला चांगला आठवते आमच्या लहानपणी आणि तिसरी चौथी पाचवी असू.. तर आमची आई एखादा गोड-धोड काहीतरी वेगळं जेवणासाठी बनवले असेल तर ते.. आमच्या नावाचं किंवा आमच्या साठी वेगळे वाटीत काढून ठेवून माझा मुलगा,मुलगी येणार आहे असं सांगून बाजूला काढून ठेवायची .. आज त्यांच्या वृद्धापकाळात आपल्या आईवडिलांना याची गरज आहे

बापाची चप्पल मुलांच्या पायात आल्या नंतर ...बाप आपल्या मुलांना सज्ञान झाल्याच समजतो ...परंतु आता आपल्या बापास काही कळत नाही.. जुन्या विचारसरणीचा आहे आम्ही या पुढारलेल्या जगात वावरतो आहोत.. असा गैर समज व अशी धारणा आताच्या तरुणांमध्ये होऊ घातली आहे आणि तीच धारणा समाजासाठी घातक ठरत आहे...

आम्ही पाहिलेल आहे की, आपल्या आई-वडिलांनी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलांना शिकवलं त्याला अधिकारी केल, त्याला नोकरी लागली त्याला उद्योग व्यवसाय करून दिला, त्याच थाटामाटात लग्न केलं, परंतु ज्या वेळेला त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळी मुलांची गरज आहे, त्या वेळेला ही मुलं आपल्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून पंख आल्यासारखे दुसऱ्या ठिकाणी जाऊन मजेत राहत असतात, आणि आई-वडिलांच्या कडे लक्ष देत नाहीतव साधी चौकशी देखील करत नाहीत ही समाजाची खरी शोकांतिका आहे..

कित्येक उच्च पदावरील अधिकारी उद्योगपती व आपल्याला अतिशिक्षित समजणाऱ्या लोकांच्या कडूनच असा दुर्व्यवहार आई-वडिलांच्या प्रती घडत असतो...परंतु आपल्या आईने आपल्या बापाने काय खस्ता खाल्ल्या असा थोडा जरी विचार केला तर .. आपण देखील आपल्या आई वडिलांच्या सारखे म्हातारे होणार आहोत आणि आपली मुलं ही जर असं वागतील तर?असा एक स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला तर या सगळ्या प्रश्नांची उकल होईल


आजचा "फादर डे" योग्य रीतीने आपण साजरा केला याचं समाधान लाभेल ....

संपादक ;
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई