कुंभोज लोकसंदेश वार्ताहर ; विनोद शिंगे
कोल्हापूर;हातकणंगले तालुका नाभिक समाजाची तालुका कार्यकारणी जाहीर बी एल शिंगे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी संजय सपकाळ कुंभोज यांची निवड
हातकणंगले तालुका नाभिक समाजाची कार्यकारिणी जाहीर, हातकणंगले तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब शिंगे नेज, उपाध्यक्षपदी संजय सपकाळ यांची फेरनिवड, नूतन निवडीमध्ये वैभव सपकाळ, सुरेश कदम यांना संपर्क प्रमुख व सरचिटणीस पदाची संधी, इंचलकरंजी येते आशीर्वाद मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सतत निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार व जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी नाभिक समाजाचे आराध्य दैवत सेना महाराज यांच्या मंदिरासाठी व सांस्कृतिक हॉल साठी तालुक्याच्या ठिकाणी जागा घेणे संदर्भात चर्चा करून सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. राज्यातील विविध प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र राहून लढा देणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी विनायक चव्हाण ,युवराज झुंजार, विनोद कदम सयाजी चव्हाण, सुनील सपकाळ तसेच हातकलंगले तालुक्यातील नाभिक समाज संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद शिंगे कुंभोज