रोटरी क्लब इचलकरंजी यांच्यावतीने कुंभोज येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलचे वाटप
कोल्हापूर
कुंभोज लोकसदेश वार्ताहर; विनोद शिंगे
ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्याचे आरोग्य, शिक्षण उत्तम करण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण लागेल ते प्रयत्न करू असे गौरवोद्गार रोटरी क्लबचे ट्रस्ट चेअरमन नेमिनाथ कोथळे यांनी काढले ते कुंभोज ता हातकणंगले येथे रोटरी क्लब ऑफ इचलकंजी यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रकाश रावळ हे होते
यावेळी कुंभोज परिसरातील अकरा शालेय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक, वह्या ,शालेय साहित्य व सायकलचे वाटप करण्यात आले. कुंभोज माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून रोटरी क्लब इंचलकरंजी यांच्याकडे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यासाठी रोटरी कल्ब इचलकंरजी यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला नेमिनाथ कोथळेच्या माध्यमातून प्रतिसाद मिळाला व सदर साहित्याची आज कन्याशाळा कुंभोज येथे शालेय कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
रोटरी क्लबच्या माध्यमातून आज संपूर्ण देशभर उल्लेखनीय काम चालू असून रोटरी क्लबचे शालेय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी काढले, यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार युवानेते किरण माळी उपसरपंच अनिकेत चौगुले ,प्रकाश पाटील ,दावित घाडगे सदाशिव महापुरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रकाश रावळ, सेक्रेटरी संजय घाय तिडक, डायरेक्टर सागर पाटील, रोटरी ट्रस्टचे चेअरमन नेमिनाथ कोथळे,रावसाहेब पाटील. श्रीकांत गुंडवडे,राजु मुजावर तसेच विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रकाश पाटील व आभार विनोद शिंगे यांनी मानले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई